आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. शिवाय राजस्थान रॉयल्सनेही एका युवा खेळाडूला आपल्या चमून दाखल करून घेतले आहे. त्यांनी न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले. IPL2020च्या ट्रेडमध्ये आता आणखी एक मोठं नाव आलं आहे. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे पुढील मोसमात नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी आज न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. बोल्टनं 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 व 2019मध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.
''अजिंक्य रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स प्रयत्नशील आहेत. याबाबत आधीच घोषणा करणं घाईचं ठरेल. अजिंक्यला करारबद्ध करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करायला हवी,'' असे सूत्रांनी सांगितले. दिल्लीनं यापूर्वी अश्विन आणि मयांक मार्कंडेला करारबद्ध केले आहे. अजिंक्यच्या संघात येण्यानं दिल्लीची फलंदाजांची फळी अधिक मजबूत होणार आहे.