IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार

भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 08:46 PM2023-04-16T20:46:59+5:302023-04-16T20:47:31+5:30

whatsapp join usJoin us
Big News: BCCI announces big bonanza for domestic cricketers, Ranji Trophy winning prize increased magnanimously, here's the break down | IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार

IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे. महिला प्रीमियर लीगची सुरुवात केली आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठे बदल केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी आज मोठी घोषणा केली. BCCI ने देशांतर्गत स्पर्धांवरही पैशांचा वर्षाव केला आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने बक्षीस रकमेत वाढ केली आहे. देशांतर्गत रणजी करंडक, इराणी, दुलीप करंडक, विजय हजारे करंडक, देवधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, वरिष्ठ महिला वन डे करंडक, वरिष्ठ महिला ट्वेंटी-२० करंडक या स्पर्धांचा समावेश आहे. 


रणजी ट्रॉफीच्या विजेत्याला २ कोटी, उपविजेत्याला १कोटी आणि सेमीफायनल मधील संघांना ५० लाख रुपये मिळायचे, परंतु आता विजेत्याला ५ कोटी, उपविजेत्याला ३ कोटी आणि सेमीफायनलमधील संघांना १ कोटी रुपये मिळणार आहेत. इराणी ट्रॉफीतील विजेत्यांची बक्षीस रक्कम २५ लाखांवरून ५० लाख आणि उपविजेत्याची रक्कम २५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर दुलीप ट्रॉफीच्या विजेत्याला ४० लाखवरून १ कोटी आणि उपविजेत्याला २० लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे.


विजय हजारे करंडक विजेत्याची बक्षीस रक्कम २० लाखांवरून १ कोटी आणि उपविजेत्याची बक्षीस रक्कम १५ लाखांवरून ५० लाख करण्यात आली आहे. देवधर ट्रॉफीच्या विजेत्याची बक्षीस रक्कम २५ लाखांवरून ४०लाख रुपये आणि उपविजेत्यांना १५ लाखांवरून २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. सय्यद मुश्ताक अली करंडक विजेत्याची बक्षीस २५ लाखांवरून ८० लाख रुपये आणि उपविजेत्याचे बक्षीस १० लाखांवरून ४० लाख रुपये करण्यात आले आहे. वरिष्ठ महिला वन डे ट्रॉफी विजेत्याला आता ६ लाखांऐवजी ५०लाख आणि उपविजेत्याला ३ लाखांऐवजी २५ लाख मिळतील.  

Web Title: Big News: BCCI announces big bonanza for domestic cricketers, Ranji Trophy winning prize increased magnanimously, here's the break down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.