Join us  

IPL 2022 कुठे खेळवली जाणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली घोषणा

आयपीएल २०२२चा थरार आणखी वाढणार आहे. पण, आयपीएल २०२०चा पूर्ण हंगाम आणि आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईत खेळवल्यानंतर आयपीएल २०२२ कुठे होईल,  याची सर्वांना उत्सुकता होती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 6:11 PM

Open in App

IPL 2022 in India? - इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात १० संघ मैदानावर उतरणार आहेत. RP Sanjiv Goenka आणि CVC Capital यांनी अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२२चा थरार आणखी वाढणार आहे. पण, आयपीएल २०२०चा पूर्ण हंगाम आणि आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईत खेळवल्यानंतर आयपीएल २०२२ कुठे होईल,  याची सर्वांना उत्सुकता होती आणि बीसीसीआय सचिव जय शाह ( Jay shah) यांनी अखेर हे जाहीर केले. 

इंडिया सिमेंटच्या ७५व्या वर्षपूर्ती निमित्तानं चेन्नईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आयपीएल २०२१च्या जेतेपदाचा आनंदही साजरा केला गेला. CSKच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी जय शाह यांनी आयपीएल २०२२ भारतातच होणार असल्याचे जाहीर केले. BCCI secratary confirms IPL 2022 will be held in India.

असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)

  • २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. 
  • दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
  • गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
  • साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.

 

प्ले ऑफचे चार सामने  

  • क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
  • अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २ 
टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सजय शाहबीसीसीआय
Open in App