Join us  

मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी

नव्या मालिकेपूर्वीच भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:08 PM

Open in App

Gautam Gambhir Team India, IND vs SA: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ सामन्यांची टी२० मालिका ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारतीय संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी मालिकेत गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाही. न्यूझीलंडविरूद्ध भारताला मालिका पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर आता आगामी टी२० मालिकेसाठी गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला ही जबाबदारी देण्यात आली आहे. जाणून घेऊया यामागचे कारण.

गौतम गंभीर हा संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तो संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या कसोटी संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत संघासोबत नसेल. भारतीय कसोटी संघाला बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. १० नोव्हेंबरला भारताचा कसोटी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही याच वेळेत आहे. ८, १०, १३ आणि १५ नोव्हेंबरला टी२० मालिकेतील चार सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय टी२० संघासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून असेल. तर गौतम गंभीर कसोटी संघाला मार्गदर्शन करेल.

आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी२० संघ:- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, विजय कुमार, आवेश खान, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि यश दयाल

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया