Join us  

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारच नव्हे, तर टीम इंडियाच्या संपूर्ण संघात होणार मोठे फेरबदल

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ वन डे, ३ कसोटी व ४ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 4:30 PM

Open in App

विराट कोहली ( Virat Kohli) हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावर कायम राहणार नाही. आयपीएल २०२१ला सुरुवात होण्यापूर्वी विराटनं वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) हे कर्णधारपदासाठी नाव पुढे आलं आहे. रोहितसह लोकेश राहुल व रिषभ पंत ही नावंही चर्चेत आहेत. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर केवळ कर्णधारच नव्हे, तर संपूर्ण संघात मोठे फेरबदल होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. Senior players are likely to be rested for the T20 home series against New Zealand

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा १४ नोव्हेंबरला संपणार आहे आणि तीन दिवसांनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. १७, १९ आणि २१ नोव्हेंबरला अनुक्रमे जयपूर, रांची आणि कोलकाता येथे ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर कानपूर व मुंबई येथे दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. ७ डिसेंबरला ही मालिका संपेल आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. 

इंग्लंड दौऱ्यापासून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडू सातत्यानं बायो बबलमध्ये आहेत. ''संघातील बरेच सीनियर खेळाडू चार महिन्यांपेक्षा अधिककाळ बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी पुरेशी विश्रांती दिली जाईल,''असे सूत्रांनी PTIला सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विराटला विश्रांती दिली जाईल, त्यामुळे रोहितला विश्रांती मिळणे अवघड आहे. तोच ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर नियुक्त होण्याची शक्यता अधिक आहे. अशात ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, हर्षल वटेल, आवेश खान, वेंकटेश अय्यर आणि अन्य काही युवा खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते.  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ वन डे, ३ कसोटी व ४ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. तिथून पुन्हा मायदेशात टीम इंडिया ३ ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला भिडतील. या मालिकेतील एक कसोटी सामना मुंबईत होणार आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली
Open in App