आप्पासाहेब पाटील
सोलापूर : बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर ३ ते ६ डिसेंबर २०२२ या चार दिवसाच्या कालावधीत
महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम १९ वर्षाआतील कूचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय सुरवसे व सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे उद्घघाटन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन तथा आ. रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे रियाज बागवान व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता महानगरपालिकाचे अधिकारी , स्मार्ट सिटी व सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे पदाधिकारी व सभासद प्रयत्नशील आहेत. या पत्रकार परिषदेस दतात्रय सुरवसे, चंद्रकांत रेम्बर्सू , श्रीकांत मोरे, प्रकाश भुतडा , दिलीप बचुवार - चीनीवार, संतोष बडवे , राजेंद्र गोटे , राजन कामत आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मार्गदर्शनाखाली विविध समितीचे नियोजन केले असून स्पर्धा प्रमुख म्हणून धैयशील मोहिते पाटील हे काम पाहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाकडून सोलापूरचे आर्शिन कुलकर्णी व यश बोरामणी यांचा समवेश असून त्यांचा खेळ आपल्या सोलापूरवासियांना पहायला मिळणार आहे. सोलापूर स्मार्ट सिटीच्या व सोलापूर महानगपालिका माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम चे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर भविष्यात रणजी सामने होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------
अशा आहेत समित्या...
- स्वागत समिती - रणजितसिंह मोहिते पाटील, दतात्रय सुरवसे , श्रीकांत मोरे, ए.डी चिनीवार, दिलीप बच्चूवार, धैयशील मोहिते पाटील, किरण पवार, नागेश वल्याळ व सर्व पदाधिकारी.
- भोजन समिती - शिवा अकलूजकर, संतोष बडवे, जावेद जमादार, मल्लिनाथ याळगी, मल्लु चौधरी, दया नवले, नबिलाल पटेल.
- निवास समिती- सर्फराज सय्यद ,आनंद शेलार , प्रसाद शावतूल, दशरथ कोळी
- क्रीडागण समिती- के.टी.पवार, संजय मोरे , दिलीप आव्हाड, राजू रंगम, सुकज जमादार
- प्रसिध्दी समिती- प्रकाश भुतडा, राजेंद्र गोटे, सुनील मालप,۔संजय वडजे
-----------
इंदिरा गांधी स्टेडियमवर यापूर्वी झालेले सामने...
या अगोदर इंदिरा गांधी स्टेडियमवर १९५२ मध्ये महाराष्ट्र विरूद्ध मुंबई हा रणजी सामना झाला होता. १९५६ मध्ये महाराष्ट्र विरूद्ध मुंबई रणजी सामना झाला. १९५८ मध्ये पहिल्यांदाच पश्चिम विभाग विरूद्ध वेस्ट इंडीज या संघात काउंटी सामना झाला होता. १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्यपाल विरूद्ध गुजराथ राज्यपाल हा सामना सरक्षण निधी साठी सामना झाला. १९६९ मध्ये महाराष्ट्र विरूद्ध मुंबई , १९७८ मध्ये महाराष्ट्र विरूद्ध गुजरात रणजी सामना झाला.
१९८० मध्ये स्टेट बँक विरूद्ध शेष भारत कसोटीपटू चा प्रदर्शिनिय सामना झाला. १९८१ मध्ये महाराष्ट्र विरूद्ध बडोदा रणजी, १९८४ मध्ये देवधर करडंक एक दिवसीय सामना, १९८६ ला परत महाराष्ट्र विरूद्ध मुंबई , १९९४ ला परत महाराष्ट्र विरूद्ध मुंबई हा रणजी सामना झाला होता. याशिवाय १५ व २२ वर्षाआतील मुलांचे यशस्वी आयोजन सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
Web Title: big news; Maharashtra-Sikkim cricket match will be held in Solapur between 3rd and 6th December
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.