भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून 9 महिन्यांपासून दूर आहे. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा धोनीचा निर्धार होता. पण, कोरोना व्हायरसमुळे आलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे आयपीएल स्पर्धेवर आलेल्या अनिश्चिततेच्या सावटामुळे धोनीचं पुनरागमन कठीण दिसत आहे. पण, धोनीनं क्रिकेट मंडळाकडे एक विनंती केली आहे आणि ती मान्य झाल्यास धोनी मैदानावर पुन्हा फटकेबाजी करताना दिसेल.
आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट असताना धोनीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं तसे झारखंड क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यावरचा निर्णय होण्याची शक्यता आहे. झारखंड क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यानं एका वेबसाईटला सांगितले की,''धोनी सध्या झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय संकुलात कसून सराव करत आहे. तो राज्य संघाच्या संपर्कात आहे. 38 वर्षीय धोनीनं 2007मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हा त्यानं चार सामन्यांत 61.50च्या सरासरीनं 123 धावा केल्या होत्या.''
Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता. पण, कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा होईल की नाही, यावर संभ्रम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी धोनी उत्सुक आहे. त्यानं राज्य मंडळाकडे तसा प्रस्ताव ठेवला आहे.''
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...
संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!
गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार
गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी
Video : 'Desert Storm' नंतर जेव्हा Sachin Tendulkar बॅट तळपली होती...
Web Title: Big News: MS Dhoni desires to play upcoming Syed Mushtaq Ali T20 trophy svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.