Join us  

KKR new captain announced: कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराची घोषणा केली; पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे होते शर्यतीत!

IPL 2022, Kolkata Knight Riders captain : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी अखेर कर्णधाराची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 4:13 PM

Open in App

IPL 2022, Kolkata Knight Riders captain : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी अखेर कर्णधाराची घोषणा केली. ब्रेंडन मॅक्यूलम, सौरव गांगुली, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांच्यानंतर KKRच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. IPL 2022 Mega Auction मध्ये KKRने त्या दृष्टीने संघात श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer), पॅट कमिन्स ( Pat Cummins) व अजिंक्य  रहाणे (Ajinkya Rahane) अशी काही नावं निवडली. श्रेयसवरील यशस्वी बोलीनंतर तोच KKRचा कर्णधार असेल असा अंदाज बांधला गेला होता, परंतु  KKRचे सीईओ वेंकी मैसूर यांनी ( CEO Venky Mysore ) यांनी तेव्हा गुगली टाकली होती. 

वेंकी मैसूर म्हणाले होतो की,''पहिल्या सत्र आमच्या नावावर राहिले याचा आनंद आहे. पॅट कमिन्ससाठी आम्हाला सर्वाधिक रक्कम मोजावी लागेल असे वाटले होते, परंतु त्याला इतक्या कमी किमतीत घेता आले याचा आनंद आहे. श्रेयस अय्यर हा दमदार फलंदाज आहे आणि तोही आमच्या ताफ्यात आल्याचा आनंद आहेच.'' अय्यरला कर्णधार बनवणार का?, या प्रश्नावर मैसूर म्हणाले, तो निर्णय प्रशिक्षक आणि आमच्या थिंक टँकचा आहे. सध्या आम्ही ऑक्शनवर लक्ष देत आहोत. कमिन्स आणि श्रेयस हे कर्णधारपदाचे दोन तगडे उमेदवार आमच्याकडे आहेत.''  

त्यानंतर अजिंक्य रहाणेला संघात घेतल्यावर सह मालकीण जुही चावला हिची कन्या जान्हवी हिनेही अजिंक्यच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले होते. पण, अखेरीस आज कर्णधार कोण यावरील पडदा उघडण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच IPL अंतिम फेरीत पोहोचवणारा श्रेयस अय्यर हा आता कोलकाताचा कर्णधार असणार आहे. यापूर्वी दिल्लीकडून कोलकाता संघात दाखल झालेल्या गौतम गंभीरने KKRला दोन जेतेपदं जिंकून दिली होती आणि तोच करिष्मा श्रेयस करेल का याची उत्सुकता आहे. कोलकाताने श्रेयससाठी १२.२५ कोटी रुपये मोजले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार

  • सौरव गांगुली ( २००८ व २०१०)
  • ब्रेंडन मॅकलम ( २००९)
  • गौतम गंभीर ( २०११ - २०१७) 
  • दिनेश कार्तिक ( २०१८ ते २०२०)
  • इयॉन मॉर्गन  ( २०२०- २०२१)  
  • श्रेयस अय्यर ( २०२२-)

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), मोहम्मद नबी ( १ कोटी), सॅम बिलिंग ( २ कोटी), उमेश यादव ( २ कोटी),   शिवम मावी ( ७.२५ कोटी),  शेल्डन जॅक्सन  ( ६० लाख), अजिंक्य रहाणे ( १ कोटी), रिंकू सिंग ( ५५ लाख), अनुकूल रॉय (  २० लाख), अॅलेक्स हेल्स ( १.५० कोटी), रसिख दार ( २० लाख), टीम साऊदी ( १.५० कोटी), बाबा इंद्रजित ( २० लाख), चमिका करुणारत्ने ( ५० लाख), अभिजित तोमर ( ४० लाख), प्रथम सिंग ( २० लाख), अशोक शर्मा ( ५५ लाख), अमन खान ( २० लाख), रमेश कुमार ( २० लाख).  

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यरआयपीएल २०२२
Open in App