Join us  

मोठी बातमी: नवीन फॉरमॅट, नवीन ठिकाण; T20 World Cup 2024 स्पर्धेत येणार ट्विस्ट, Super 12 OUT! 

New format, new location: How the 2024 T20 World Cup will look - २०२४ मध्ये अमेरिका/वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 5:54 PM

Open in App

New format, new location: How the 2024 T20 World Cup will look - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सहज पराभव करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नावावर केला. या स्पर्धेत टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु इंग्लंडने उपांत्य फेरीत हाही अडथळा दूर केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पाकिस्तानने नमवले. या स्पर्धेने व्ह्युअर्सशीपचे सारे विक्रम मोडले आणि २०२४ मध्ये अमेरिका/वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. नवीन ठिकाणी होणाऱ्या त्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नवीन फॉरमॅटही पाहायला मिळणार आहे.  

सूर्यकुमार यादवचा सक्सेस मंत्रा! पत्नीला वेळ देणे अन् दिवसाला ३० मिनिटं घरच्यांशी गप्पा मारणे

अमेरिकेत प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि या स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत. २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप वेस्ट इंडिजअमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. त्यामुळे हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत. त्यात २०२२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघही पुढील स्पर्धेत थेट पात्र ठरले. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांनी २०२४च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी ICC रँकींगनुसार थेट प्रवेश पक्का केला. 

जाणून घ्या नवीन फॉरमॅट....

  • २० संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा बाद फेरीपूर्वी दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे.
  • २०२१ व २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला राऊंड/सुपर १२ असा फॉरमॅट होता
  • २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघांची चार गटांत विभागणी होणार आहे 
  • या चार गटातील अव्वल दोन संघ Super 8 मध्ये एकमेकांशी खेळतील
  • सुपर ८ मध्ये दोन गटांत संघांची विभागणी असेल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील

 

आतापर्यंत यजमान अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्यासह १२ संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी पात्र ठरले आहेत. उर्वरीत ८ जागांसाठी पात्रता फेरी होईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२अमेरिकाआयसीसीवेस्ट इंडिज
Open in App