राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याची उणीव कशी भरून काढायची हा प्रश्न सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजच्या संघापुढे आहे.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोच हा पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. केमारच्या आजीचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याला तातडीने मायदेशी परतावे लागणार आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना त्याला खेळता येणार नसल्याने त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले की, " सामना सुरु होण्यापूर्वी आम्हाला बसलेला हा मोठा धक्का आहे. कारण केमार हा आमचा मुख्य गोलंदाज होता. तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्यामुळे नवीन चेंडू कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्द करायला हा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे."