WTC Final IND vs AUS, Protest in London | भारतीय क्रिकेट संघ सध्या लंडनमध्ये आहे. धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाला 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल-2023)चा अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून कडवे आव्हान आहे. त्या आधी गुरुवारी लंडनमध्ये मोठा गदारोळ झाला. आंदोलकांनी टीमची बसच अडवली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले.
टीम बस थांबवली
इंग्लंडचा संघ सध्या आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी (ENG vs IRE 1st test) सामना खेळत आहे. याच सामन्यासाठी गुरुवारी इंग्लंडचा क्रिकेट संघ लॉर्ड्सला जात असताना आंदोलकांनी संघाची बस अडवली. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये पोलीस टीम बससमोर उभे असलेले दिसत आहेत.
लंडनमधला प्रकार
लंडनमध्ये 'जस्ट स्टॉप ऑइल' घेऊन निदर्शने केली जात आहेत. त्याच्या आश्रयाने, आंदोलक यूके सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांशी संबंधित सर्व परवाने आणि मंजूरी थांबवण्याची मागणी करत आहेत. हीच घटना इंस्टाग्रामवर शेअर करताना यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने लिहिले की, "आम्ही सामन्यासाठी थोडे उशीरा पोहोचलो तर ती आमची चूक नसेल"
दरम्यान, 'जस्ट स्टॉप ऑइल' आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी रस्त्याच्या मधोमध बसला घेरताना दिसत होते. मात्र, बस वेळेवर लॉर्ड्सला पोहोचल्याने सामना सुरू होण्यास उशीर झाला नाही. या सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आयर्लंडच्या पहिल्या डावात 98 धावांवर 5 बळी पडले, त्यापैकी 4 बळी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे होते.