Gautam Gambhir News : मागील काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लवकरच प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. परदेशी शिलेदारांपासून भारतातील काही माजी खेळाडूंची नावे या पदासाठी घेतली जात आहेत. अशातच गौतम गंभीरला या पदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरच्या संघाने आयपीएल २०२४ चा किताब जिंकला.
खरे तर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह आणि गौतम गंभीर यांची मैदानात काही मुद्द्यांवर चर्चा झाली. ही चर्चा प्रशिक्षकपदाबद्दल असल्याचे कळते. 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमधील एका संघाच्या मालकाने गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल यावर शिक्कामोर्तब केला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, हे देखील समोर आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी अशा काही बनावट नावांचा समावेश आहे. BCCI ने अलीकडेच मुख्य प्रशिक्षकपदासाठी रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधण्यास नकार दिला होता. गंभीरने या पदासाठी अर्ज केला असेल भूमिका स्वीकारली असली, तर त्याला KKRचे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान सोडावे लागेल. गंभीरने कर्णधार म्हणून KKR सोबत दोन वेळा आयपीएल जिंकली आहे.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.