Join us  

Big Update IPL 2023 Format : तीन वर्षांनंतर आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये होतोय बदल; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा 

IPL 2023 Format : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय व फ्रँचायझी सज्ज होत आहेत. कोरोना काळामुळे बऱ्याच मर्यादांमध्ये आणि भारताबाहेर आयपीएल खेळवावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 3:07 PM

Open in App

IPL 2023 Format : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय व फ्रँचायझी सज्ज होत आहेत. कोरोना काळामुळे बऱ्याच मर्यादांमध्ये आणि भारताबाहेर आयपीएल खेळवावी लागली. पण, मागच्या वर्षी  महाराष्ट्रात आयपीएलचे साखळी सामने झाले अन् कोलकाता व अहमदाबाद येथे बाद फेरीच्या लढती झाल्या. आता कोरोनामुळे लावण्यात आलेली सर्व बंधन उठवण्यात आली आहे आणि १० संघांच्या सहभागामुळे आयपीएल २०२३चा कालावधीही वाढणार आहे. त्याचसोबत आयपीएलचे १६ वे पर्व त्याच्या जुन्या फॉरमॅटमध्ये परतणार आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याबाबतचे मोठे अपडेट्स दिले.

आयपीएल २०२२त गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या फ्रँचायझींमुळे संघसंख्या १० झाली. त्यामुळे संघांची प्रत्येकी ५ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली. गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन व  दुसऱ्या गटातील दोन संघांशी प्रत्येकी १ असे सामने खेळले. महाराष्ट्रात लीग फेरीचे सर्व सामने झाल्याने होम - अवे असा फॉरमॅट खेळवता आला नाही. पण, आयपीएल २०२३ मध्ये पुन्हा होम-अवे फॉरमॅट दिसणार आहे. प्रत्येक संघ एकमेकांना त्यांच्या घरी व प्रतिस्पर्धीच्या मैदानावर भिडेल.  

गांगुली म्हणाला, ''आयपीएलच्या पुढील पर्वात होम-अवे सामने होतील. सहभागी १० संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळतील.'' BCCI ने या संदर्भातील पत्र राज्य संघटनांना पाठवले आहे. २०२०नंतर प्रथमच आयपीएल जुन्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. यावेळी गांगुलीने महिला आयपीएलबाबतही भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, बीसीसीआय सध्या महिलांच्या आयपीएल आयोजनावर काम करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला महिला आयपीएलचे पहिले पर्व खेळवले जाऊ शकते. सध्या तरी स्थानिक स्पर्धांमध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या वन डे स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर व पुणे येथे खेळवण्यात येईल. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२सौरभ गांगुलीबीसीसीआय
Open in App