Join us  

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट; सामना खेळणार की मुकणार...

रोहित पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात खेळणार की नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 8:30 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माला सराव करताना दुखापत झाल्याचे वृत्त होते. दुखापतीनंतर रोहितने लगेचच मैदान सोडल्याचेही समोर आली होती. आता रोहितच्या दुखापतीवर मोठं अपडेट समोर आलं आहे. रोहित पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात खेळणार की नाही, हे या अपटेडमधूनच कळू शकणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिला ट्वेन्टी-20 सामना नवी दिल्लीला होणार आहे. या सामन्याच्या सरावासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरला होता. पण यावेळी सराव करताना रोहितला दुखापत झाली होती.

रोहित नेट्समध्ये सराव करत होता. तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या मांडीवर आदळला. हा फटका एवढा जोरदार होता की, रोहितने तिथून बाहेर पडणे उचित समजले. त्यानंतर रोहितने दुखापतीवर बर्फ लावला. ही दुखापत कमी होत नसल्याने त्याने थेट मैदान सोडले. ही दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे, हे अजून समजू शकलेले नाही.

रोहितला दुखापत झाली असली तरी तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याचबरोबर तो बांगलादेशबरोबरचा पहिला सामना खेळणार आहे.

दिल्लीतील ट्वेन्टी-20 सामन्यावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान दिल्लीमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये 3 नोव्हेंबरला पहिला ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी बीसीसीआयकडे बऱ्याच जणांनी केली आहे. आता या वाद-विवादामध्ये भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने उडी घेतली आहे.

 

आज बांगलादेशच्या संघाने स्टेडियममध्ये कसून सराव केला. सराव करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिल्लीमध्ये एकही सामना खेळवू नये, असे मत व्यक्त केले होते. आता या सामन्याबद्दल रोहित शर्माने एक मोठे विधान केले आहे.

यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना याच मैदानात खेळवण्यात आला होता. आता बांगलादेशबरोबर ट्वेन्टी-20 सामनाही होणार आहे. या सामन्याबद्दल रोहित म्हणाला की, " भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना या मैदानात यशस्वीपणे खेळवला गेला होता. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धचा सामनाही यशस्वीपणे पार पडेल. हा सामना खेळताना आम्हाला कोणतीही समस्या जाणवणार नाही."

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश