भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरेच दिवस झाले आहेत. सध्या तो आपली लाईफ एन्जॉय करत आहे. पण, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो. निवृत्तीपूर्वी असो वा निवृत्तीनंतर धोनीचा विविध कार्यक्रमातील किंवा सार्वजनिक ठिकाणचा वावर हा चर्चेचा विषय बनतो. चाहत्यांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओही त्याचे व्हायरल होत असतात. आता, धोनीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, हा फोटो पाहून नेटीझन्सने नाराजी दर्शवली. कारण, धोनीचा हा फोटो एम.सी.स्टॅनसोबतचा आहे.
एम.सी. स्टॅन हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो हिंदीतील प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉस १६ चा विजेताही आहे. त्यामुळे, सेलिब्रिटींसोबत त्याचा वावर किंवा उपस्थिती अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, नुकतेच एम.सी.स्टॅन आणि धोनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीच्या चाहत्यांना हा फोटो आवडला नाही. धोनीची नेमकी काय मजबुरी होती, ज्यामुळे त्याने एम.सी.स्टॅनसोबत फोटो काढला असे काही नेटीझन्सने म्हटले. तर, धोनीच्या आयुष्यातील ही एकमेव चूक असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
जॉन्स या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, धोनी, एम.सी.स्टॅन आणि एकजण असे तिघे जण दिसून येतात. या फोटोवर नेटीझन्सने कमेंट करुन नाराजी दर्शवली आहे.
कार्यक्रमात की जाहिरातीत?
निवृत्तीनंतरही धोनी अनेक जाहिरातीच्या बँडसाठी काम करतोय. काही दिवसांपूर्वीच ‘झेड ब्लॅक’ या भारतातील आघाडीच्या ब्रँडच्या थ्री इन वन प्रीमिअम अगरबत्तीच्या नव्या जाहिरातीत दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी दिसून आला होता. प्रेमळ पित्याच्या भूमिकेत त्याने या जाहिरातीमध्ये काम केलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून एमएस धोनी झेड ब्लॅकचा ब्रँड अँबेसेडर आहे. यासह अनेक जाहिरातींचा ब्रँड अम्बेसिडर म्हणूनही धोनी विविध जाहिरातींमध्य झळकतो. त्यामुळे, एम.सी.स्टॅन धोनीसोबत कुठल्या जाहिरातीचा भाग तर नाही ना, अशीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. कुठल्यातरी कार्यक्रमात ते एकत्र आले असतील असेही काहींचे म्हणणे आहे.
Web Title: Bigg Boss winner MC Stan seen with MS Dhoni; Netizens told Mahi on social media disappointed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.