भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियात सहभागी होऊ शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमराहबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. याबाबत जाणून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमतरता आशिया चषकापासून ते विश्वचषकापर्यंत सर्वांनाच जाणवली होती. आता चेतन शर्मा यांनी बुमराहच्या दुखापतीचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. टीम इंडियाने 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळली होती. झी मीडिायने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केलाय. या मालिकेबाबत चेतन शर्मा म्हणाले, “तो (बुमराह) तंदुरुस्त होता, आता तो (बुमराह) तंदुरुस्त आहे, म्हणून आम्ही त्याला तिसऱ्या सामन्यात खेळवण्याची योजना आखली होती, पण राहुल द्रविड आणि रोहितची इच्छा होती की त्याने दुसरा सामना खेळावा. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देऊ. याला आपण लवकर ऑस्ट्रेलियाला पाठवू, जे आपल्या प्रॅक्टिस मॅच आहेत तिकडे तीन चार पैकी दोन सामने त्याला खेळवू. त्यावेळी मी बुमराहशी बोललो तेव्हा त्याला पहिला सामना खेळण्याची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले
“मी बुमराहशी बोललो तेव्हा त्याला पहिला सामना खेळण्याची इच्छा होती. सर मला पहिला सामना खेळायचाय असे तो म्हणाला. मी त्याला पहिला नाही दुसरा सामना खेळ म्हटले. जेव्हा तो दुसरा सामना खेळला तेव्हा संध्याकाळी मला फोन आला की सर थोडं आपण स्कॅनसाठी पाठवू. आता मॅनेजमेंट अडकले, सिलेक्टर्सही फसले की हा तक्रार करतोय. जर आम्ही याला ऑस्ट्रेलियाला नेलं आणि टीममध्ये घेतलं तर नंतर बदलता येणार नाही. तेव्हा पूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते,” असे त्यांनी सांगितले.
दुखापतीनंतरही खेळण्यास तयारम्हणजेच बुमराह दुखापतग्रस्त होता पण संघात राहण्यासाठी तो बरा असल्याचा दावाही करत होता. अनफिट बुमराह संघातच राहिला आणि त्याला तिसरा सामनाही खेळवण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला की यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या बुमराहने 4 षटकात 50 धावा दिल्या आणि त्याला एक बळीही मिळवता आला नाही. बुमराहची दुखापत मोठी होती आणि समोर विश्वचषक होता. “दुसऱ्या सामन्याच्या मध्यावर, संध्याकाळी, मला मेसेज मिळाला की आम्ही त्याला पुन्हा स्कॅनसाठी घेऊन जाणार आहोत. एक-दोन सामन्यात तो नसेल. जर सर आपण त्याला खेळवले तर तो किमान एक वर्षासाठी बाहेर जाईल. आता निवड समिती अडकली आहे. क्रीडाशास्त्रही अडकले की आता काय करायचे,” असे चेतन शर्मा पुढे म्हणाले.