Video : विजयासाठी ३ चेंडूंत हव्या होत्या ४ धावा, पण 'बाई'ने हॅटट्रिक घेऊन सामनाच फिरवला

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिलांच्या स्पर्धेत बर्मिंगहॅम फिनिक्स आणि वेल्श फायर यांच्यात १४ वा सामना खेळला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:09 PM2023-08-11T14:09:07+5:302023-08-11T14:09:38+5:30

whatsapp join usJoin us
Birmingham Phoenix needed 4 runs needed off 3 balls. Incredibly, Shabnim Ismail produced a hat-trick to win the game for Welsh Fire, Watch Video  | Video : विजयासाठी ३ चेंडूंत हव्या होत्या ४ धावा, पण 'बाई'ने हॅटट्रिक घेऊन सामनाच फिरवला

Video : विजयासाठी ३ चेंडूंत हव्या होत्या ४ धावा, पण 'बाई'ने हॅटट्रिक घेऊन सामनाच फिरवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिलांच्या स्पर्धेत बर्मिंगहॅम फिनिक्स आणि वेल्श फायर यांच्यात १४ वा सामना खेळला गेला. ज्यामध्ये वेल्श संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बर्मिंगहॅम संघाला शेवटच्या तीन चेंडूंवर विजयासाठी चार धावांची गरज होती. पण, दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईल (Shabnim Ismail) हिने  सलग तीन विकेट घेत धुमाकूळ घातला आणि वेल्श संघाने ३ धावांनी जिंकला.


एजबॅस्टन मैदानावर बर्मिंगहॅम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात वेल्श संघाकडून कर्णधार टॅमी ब्युमॉन्टने ४० चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे बर्मिंगहॅम संघाने १००चेंडूत ७ विकेट गमावत १३७ धावा केल्या. १३८धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅमचे सलामीवीर टेस फ्लिंटॉफ आणि सोफी डिव्हाईन यांनी ४१ धावांची भागीदारी केली. सोफी १९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह २९ धावा करून बाद झाली. यानंतर एमी जोन्स आणि फ्लिंटॉफने संघाला सहज विजयाच्या उंबरठ्यावर आणले.  बर्मिंगहॅम संघाला शेवटच्या ५ चेंडूत धावांची गरज होती. 


3 चेंडू आणि ४ धावांचा थरार... 
१०० चेंडूंच्या सामन्यात ५ चेंडूंचे एक ओव्हर असते. ज्यात शबनिम शेवटची ओव्हर करायला आली होती. शबनिमच्या पहिल्याच चेंडूवर एमी जोन्सने एकेरी धाव घेतली. यानंतर फ्लिंटॉफने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. आता बर्मिंगहॅमला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज होती. त्यानंतर तिसर्‍या चेंडूवर शबनिमने फ्लिंटॉफला पायचीत केले. त्यामुळे फ्लिंटॉफ ४५ चेंडूत ६ चौकारांसह ५५ धावांवर बाद झाली. चौथ्या चेंडूवर एरिस बर्न्स आणि पाचव्या चेंडूवर इस्सी वँगला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. बर्मिंगहॅमचा संघ ४ बाद १३४ धावाच करू शकला. एमी जोन्सने ३४ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ४८ धावा केल्या.


Web Title: Birmingham Phoenix needed 4 runs needed off 3 balls. Incredibly, Shabnim Ismail produced a hat-trick to win the game for Welsh Fire, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.