वाढदिवशीच भारतीय खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना आज कर्नाटक आणि तामीळनाडू यांच्यात खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:50 PM2019-10-25T13:50:54+5:302019-10-25T13:51:16+5:30

whatsapp join usJoin us
Birthday boy Abhimanyu Mithun bags historic hat-trick in Vijay Hazare Trophy final against Tamil Nadu | वाढदिवशीच भारतीय खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

वाढदिवशीच भारतीय खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना आज कर्नाटक आणि तामीळनाडू यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात कर्नाटकचा प्रभावी गोलंदाज अभिमन्यू मिथून यानं ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे आज त्याचा 30वा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी इतिहासात स्वतःचं नाव नोंदवून अभिमन्यूनं स्वतःला अनोखी भेट दिली. अभिमन्यूनं अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि त्यानं 34 धावांत 5 फलंदाज माघारी पाठवून तामीळनाडूचा डाव 252 धावांत गुंडाळला. 

विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेणारा अभिमन्यू पहिला गोलंदाज ठरला आहे. शिवाय कर्नाटकसाठी लिस्ट A क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पहिला मानही त्यानं पटकावला. रणजी करंडक आणि विजय हजारे अशा दोन्ही स्पर्धेत हॅटट्रिक अभिमन्यूनं नावावर केली आहे.


 
अभिमन्यूनं भारतीय संघाचा सलामीवीर मुरली विजय ( तामीळनाडू संघाचे प्रतिनिधित्व )ला बाद केले. त्यानंतर त्यानं विजय शंकरला ( 38) बाद करून कर्नाटकला मोठं यश मिळवून दिलं. डावाच्या अखेरच्या षटकात त्यानं हॅटट्रिक घेतली. शाहरुख खान, एम मोहम्मद आणि टी नटराजन यांना अभिमन्यूनं बाद करून हॅटट्रिक साजरी केली.
  
- विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
- लिस्ट A क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा कर्नाटकचा पहिला गोलंदाज
- रणजी करंडक आणि विजय हजारे अशा दोन्ही स्पर्धांत हॅटट्रिक नावावर असलेला दुसरा ( मुरली कार्तिक) गोलंदाज

Web Title: Birthday boy Abhimanyu Mithun bags historic hat-trick in Vijay Hazare Trophy final against Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.