नवी दिल्ली : ‘न्यूझीलंड दौºयातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान वेगवान वाऱ्यांवर मात करण्याचे कडवे आव्हान भारतीय संघापुढे असेल. वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च येथे खेळताना हवामानाशी एकरूप होणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे मत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले आहे.
भारताला वेलिंग्टन येथे २१ ते २५ फेब्रुवारी आणि ख्राईस्टचर्च येथे २९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याआधी पाच टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्य म्हणाला, ‘आम्ही तेथे २०१४ ला मालिका खेळलो. सामन्यादरम्यान वेगवान वारे वाहतात. त्यामुळे परिस्थितीशी एकरूप होणे गरजेचे आहे. मागच्या वेळी ख्राईस्टचर्च येथे सामना खेळायला मिळाला नव्हता.’ या दौऱ्यासाठी रहाणे डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरचा मारा खेळण्यासाठी सराव करीत आहे. याबाबत तो म्हणाला,‘वॅगनरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली. केवळ तोच नव्हे, तर आम्हाला प्रतिस्पर्धी संघातील सर्वच गोलंदाजांचे आव्हान असेल.’
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि भारत अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देतील, असा विश्वास व्यक्त करीत रहाणे म्हणाला,‘दोन दिग्गज एकत्र येऊन खेळाला नवी उंची गाठून देतील, यात शंका नाही. २०१४ ला न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झालेला भारतीय संघ युवा होता, मात्र आता संघ अनुभवी झाला आहे.
न्यूझीलंड दौºयापासूनच आम्ही नंबर वन बनण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी कसोटी क्रमवारीत आम्ही सहाव्या आणि सातव्या स्थानी होतो.’ तसेच, ‘ड्रेसिंग रूममध्ये आनंदी वातावरण बनविण्याचे श्रेय कोहली आणि रवी शास्त्री यांना जाते,’ असेही अजिंक्यने आवर्जून सांगितले.
यजमान संघाला परिस्थितीचा लाभ मिळणार असल्याने आम्हाला नैसर्गिक खेळ करावाच लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या माºयाला तोंड देण्यासाठी वेगवेगळे उपाय असतात. प्रत्येकाकडे वेगळे उपाय असतात. काही जण क्रीझच्या बाहेर तर काही क्रीझच्या आत उभे राहणे पसंत करतात.
न्यूझीलंड दौºयात आखूड टप्प्याचे चेंडू टोलविणे अत्यंत जोखमीचे असेल. तंत्राबाबत अधिक विचार न करता बेसिक्सवर लक्ष देणे गरजेचे आहे. चेंडूचा वेग आणि विविधता वेगळ्या प्रकारची असणार आहे.’
मालिका सुरू होण्याआधी रहाणे भारत अ संघाकडून न्यूझीलंड अ विरुद्ध चार दिवसांचा सामना खेळणार आहे. यावर तो म्हणाला, ‘भारत अ दौरासोबत असणे ही चांगली बाब आहे. यामुळे तयारी चांगली होईल, शिवाय परिस्थितीशी एकरूप होणे सोपे जाईल.’
Web Title: Bitter challenge of speeding New Zealand tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.