Andre Russell BIZARRE RUN OUT : क्रिकेटमध्ये कोण कसं बाद होईल याचा नेम नाही.. पण, बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ( BPL) आज ज्या पद्धतीनं आंद्रे रसेल ( Andre Russell) बाद झालाय ते पाहून भल्याभल्यांचे डोकं चक्रावलं आहे. माईनस्टर ग्रुप ढाका विरुद्ध खुल्ना टायगर्स यांच्यातल्या सामन्यातील हा प्रसंग आहे. या सामन्यात रसेल हा ढाका संघाचे प्रतिनिधित्व करत होता आणि प्रथम फलंदाजी करताना या संघानं ६ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केल्या. पण, फलंदाजांच्या फटकेबाजीपेक्षा रसेलचे बाद होणे अधिक चर्चेत आले.
प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शहजाद व तमिम इक्बाल यांनी ढाका संघाला पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची सलामी दिली. मोहम्मद शहजाद २७ चेंडूंत ४२ धावा करून धावबाद झाला. त्यानंतर आलेला मोहम्मद नईम ९ धावांवर बाद झाला. कर्णधार महमदुल्ला आणि तमिम यांनी दमदार खेल करताना संघाची गाडी रुळावर आणली. तमिम ५० धावांवर बाद झाला. महमदुल्लाहनं २० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. या सामन्याच्या १५व्या षटकात आंद्रे रसेल विचित्र पद्धतीनं बाद झाला.
गोलंदाजानं टाकलेला संथ चेंडू रसेलनं थर्ड मॅनच्या दिशेनं अलदत ढकलला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. थर्डमॅनवर उभ्या असलेल्या महेदी हसननं चेंडू यष्टिरक्षकाजवळीत यष्टींच्या दिशेनं फेकला. रसेल तो पर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचणारच होता. पण, तो चेंडू यष्टिंवर आदळून नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेकडील यष्टींवर पुन्हा आदळला. रसेलला काही कळण्याआधीच धावबाद होऊन माघारी परतावे लागले.
पाहा व्हिडीओ...
Web Title: BIZARRE RUN OUT; Andre Russell gone in the most bizarrest way possible in the world of cricket, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.