क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) घरात त्याच्या दोन बहीणी आणि पत्नीमध्ये मोठा वाद सुरु आहे. यामुळे गुजरातसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या वादाकडे लागले आहे. रविंद्र जडेजाची बहीण नयबाना जडेजा (Naybana Jadeja) आणि पत्नी रीवाबा जडेजा (Riwaba Jadeja) यांच्यात राजकीय युद्ध सुरु झाले असून या वेळचा मुद्दा हा मास्क न घालण्याचा आहे. (Political fight between Ravindra Jadeja's wife and sister on no mask wearing.)
रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा ही भाजपाची नेता आहे. तसेच सौराष्ट्रची करणी क्षत्रिय सेनेची अध्यक्षा आहे. रीवाबा ही समाजसेवेत खूप अॅक्टिव्ह आहे. तर दुसरीकडे बहीण नयबाना ही काँग्रेसमध्ये अॅक्टिव्ह आहे. पत्नी रीवाबाला रविंद्र जडेजाचा पाठिंबा आहे, तर नयबानाला तिची बहीण आणि वडिलांचा पाठिंबा आहे. यामुळे घरात कौंटुंबिक कलहापेक्षा राजकीय कलहच अधिक होऊ लागला आहे.
ननंद-भावजयींमधील या वादाची सुरुवात एका राजकीय कार्यक्रमावरून झाली आहे. एका कार्यक्रमात रीवाबाने लोकांची मोठी गर्दी गोळा केली गोती. मात्र, स्वत: नीट मास्क घातला नव्हता. यावर नयबानाने कमेंट करत, गुजरातमध्ये कोरोनाची तिसरी लाट आणण्यासाठी काम करत आहेत, अशी टीका केली होती. यावरून घरातील वातावरण तापले आहे.
या आधी ऑगस्ट 2020 मध्ये रीवाबा जडेजा मास्क न घालण्यावरून वादात सापडली होती. रविंद्र जडेजाची पत्नी कारमधून जात असताना तिने मास्क घातला नव्हता. तेव्हा पोलिसांनी तिला रोखले होते. रीवाबाने पोलिसांशी हुज्जत घातली होती. आता पुन्हा एकदा रीवाबा नणंदेच्या टार्गेटवर आहे.
Web Title: BJP-Congress politics started Ravindra Jadeja's house; quarrel between the wife and sisters increased
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.