राजकारण्यांपासून ते विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करत आहेत. रामायणानुसार या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. आज विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी प्रभू रामाच्या पूजेसोबत शस्त्रपूजनही विधीनुसार केले जाते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी आमदार रिवाबा जडेजा हिने यावेळी तलवारीसह पिस्तुलाचे पूजन केले.
रवींद्र जडेजा आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. दसऱ्यानिमित्त रिवाबा जडेजाने डोक्यावर पदर घेत पिस्तूल आणि तलवारीची पूजा केली. तिच्यासोबत इतर लोकांनीही तिथे पूजा केली. यानंतर तिने उपस्थित सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. पूजेनंतर रिवाबा जडेजा म्हणाली की, आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मला शस्त्रपूजा करण्याची संधी मिळाली. माझ्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
दरम्यान, रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला तलवारबाजीची आवड असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. सामन्यात शतक झळकावल्यानंतर तो तलवारीप्रमाणे क्रिकेटची बॅट फिरवतो. तलवारीप्रमाणे बॅट फिरवणे ही जडेजाची सिग्नेचर स्टाइल बनली आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आता तो केवळ वन डे आणि कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करतो.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
राखीव खेळाडू - हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिला कसोटी सामना - १६ ते २० ऑक्टोबर, २०२४ - बंगळुरु दुसरा कसोटी सामना- २४ ते २८ ऑक्टोबर, २०२४ - पुणेतिसरा कसोटी सामना ०१ ते ५ नोव्हेंबर, २०२४ - मुंबई