Gautam Gambhir distributes sarees: २२ जानेवारी २०२४ हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरला आहे. सोमवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी देशभरात रामललाचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील विविध शहरांमध्ये या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
भारतीय लोकांनी हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदू बांधव मागील काही दशकांपासून वाट पाहत होते. तमाम भारतीयांचे स्वप्न अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण झाले. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने २२ जानेवारीच्या प्रसंगी सर्वांची मनं जिंकणारं काम केलं. गौतम गंभीरनं हा दिवस दिल्लीच्या जीबी रोड येथील महिला आणि मुलांसोबत साजरा केला. गंभीरनं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. गंभीरनं त्यांच्यासोबत प्राणप्रतिष्ठा पाहिली आणि त्यांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वादही घेतला.
गंभीरकडून सेक्स वर्कर्सना साडी, शॉलचे वाटपवृत्तसंस्था ANI शी बोलताना गंभीरने म्हटले की, राम सर्वांचा आहे आणि राम सर्वांमध्ये आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण जग राम भक्तीत तल्लीन झालं आहे. आता एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. या प्रसंगी आम्ही जीबी रोड इथं राहणाऱ्या महिलांना साड्या आणि शाली भेट म्हणून दिली.
गंभीरचं सर्व स्तरातून कौतुक दरम्यान, गौतम गंभीरनं तेथील महिलांसोबत दिवे लावून दिवाळी साजरी केली. सोशल मीडियावर गौतम गंभीरच्या या पावलाचं चाहते कौतुक करत आहेत. गौतम गंभीर अनेकदा गरीब मुलांच्या मदतीसाठी धावल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर आता समालोचनाचे कार्य करतो. याशिवाय गौतम गंभीर अद्याप लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो.