भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) माघार घेतल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) उपकर्णधार रैनानं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगण्यात आले. त्याच्या आत्येच्या घरी अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केला आणि त्यात त्याच्या काकांसह आत्येभावाचे निधन झाले. रैनाच्या आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. आता बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सन्नी देओल क्रिकेपटूच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आला आहे.
वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा
त्या रात्री नेमकं काय घडलं?19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आत्ये भाऊ कौशल कुमार ( 32 वर्ष) आणि अपीन कुमार ( 24 वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.
सन्नी देओलनं घेतली पठाणकोट पोलिसांची भेटमागील महिन्यात चोरीच्या उद्देशानं रैनाच्या कुटुंबीयांच्या घरी भ्याड हल्ला केला गेला. देओलनं शनिवारी पठाणकोट येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांची भेट घेतली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. पठाणकोट ही सन्नी देओल याच्या लोकसभा क्षेत्रात येते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video
IPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार?
IPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा!
कोरोना आहे भाऊ!, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग
IPL 2020 : तारीख पे तारीख; चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितली वेळापत्रकाची नवीन तारीख