IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो

IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित शर्माही मुंबईतील घरातच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:18 PM2020-08-13T16:18:27+5:302020-08-13T16:19:13+5:30

whatsapp join usJoin us
Black heavy beard: Rohit Sharma unveils new look ahead of IPL 2020 - see pic | IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो

IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित शर्माही मुंबईतील घरातच आहे. फेब्रुवारीतील न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोहित क्रिकेटपासून दूर आहे. आता पुढील महिन्यात रोहित मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) रोहितची बॅट तळपताना पाहण्यासाठी सर्व आतूर आहेत. रोहितही दमदार फटकेबाजीसाठी सज्ज झाला असून त्यासाठी त्यानं नवा लूक केला आहे. 

England vs Pakistan, 2nd Test : 10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी खेळाडूला मिळाली पुनरागमनाची संधी

ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज

आयपीएलच्या 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं त्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. त्याचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक 4  जेतेपदं पटकावली आहेत. गतवर्षी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला नमवून चौथे जेतेपद नावावर केलं होतं. आता यूएईत जेतेपद कायम राखण्याचं त्यांचं लक्ष आहे.


 

IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!
 

यापूर्वी 2014मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा यूएईत पार पडला होता. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिली वेळ आहे. 2014मध्ये झालेल्या आयपीएलचे एकूण 20 सामने यूएईत झाले होते. त्यापैकी 7 सामने अबु धाबी, 6 सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आणि 7 सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाले होते.

दुबई स्टेडियमवर 109 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, तर शाहजाहवर 263 आणि अबु धाबीत 103 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएलच्या 20 सामन्यांपैकी 11 सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकली आहेत. 8 सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकली आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला. पण, मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारी आकडेवारी अशी की, त्यांना येथे एकही सामना जिंकता आलेला नाही.  मुंबई इंडियन्सना यूएईत झालेल्या पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबनं सर्वच्या सर्व पाचही सामने जिंकले आहेत. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?  

विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण 

Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार 

Web Title: Black heavy beard: Rohit Sharma unveils new look ahead of IPL 2020 - see pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.