Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करावा याकरीता पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली यानं त्याच्या खास बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:40 PM2020-05-08T12:40:02+5:302020-05-08T12:41:36+5:30

whatsapp join usJoin us
Blades of Glory Cricket Museum has bought a bat auctioned by Pakistan Test captain Azhar Ali to raise funds for  COVID19 pandemic svg | Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करावा याकरीता पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली यानं त्याच्या खास बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. अझरनं 2016मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 302 धावांची खेळी केली होती आणि त्या बॅटीचा लिलाव झाला. पुण्याच्या Blades of Glory Cricket संग्रहालयानं सर्वाधिक बोली लावून ही बॅट जिंकली. बॅटसह अझरनं 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील जर्सीही लिलावासाठी ठेवली होती. या बॅट व जर्सीवर पाकिस्तानी खेळाडूंची स्वाक्षरी आहे.


अझरनं सोशल मीडियावर ही घोषणा केली. अझरनं बॅट आणि जर्सीसाठी दहा लाखांची आधारभूत किंमत ठेवली होती. त्यानं या लिलावातून 22 लाख रुपये जमवले. त्यानं लिहिलं की,'' पुण्याच्या Blades of Glory Cricket संग्रहालयानं दहा लाखांची सर्वाधिक बोली लावून बॅट खरेदी केली. लिलावासाठी ठेवलेल्या जर्सीसाठी अनेकांनी उत्सुकता दर्शवली आणि कॅलिफोर्नियाच्या एका पाकिस्तानी खेळाडूनं ती 11 लाखांत खरेदी केली. न्यूजर्सीत राहणाऱ्या एका पाकिस्तानी जमाल खान यांनी एक लाख रुपये दान केले.''

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 39 लाख, 17,585 इतकी झाली असून 13 लाख, 44,136 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 2 लाख 70,720 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानातील रुग्णांची संख्या 25, 837 झाली असून 594 जणांचा मृत्यू झाला आहे. 7530 लोकं बरी झाली आहेत. पाकिस्तान सरकारला मदतीसाठी अझरनं या वस्तू लिलावासाठी ठेवल्या होत्या.  
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी

शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही

इंग्लंडच्या विश्वविक्रमी फलंदाजाचे निधन; आजही 'तो' विक्रम अबाधित

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...

Web Title: Blades of Glory Cricket Museum has bought a bat auctioned by Pakistan Test captain Azhar Ali to raise funds for  COVID19 pandemic svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.