भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली अवघ्या 20 धावा करून माघारी परतला. रोहित शर्मा ( 176) आणि मयांक अग्रवाल ( 215) या सलामीवीरांनी खोऱ्यानं धावा केल्यानंतर कोहलीकडूनही दमदार फटकेबाजीची अपेक्षा होती. पण, तो अपयशी ठरला. त्याच्या या निराशाजनक कामगिरीनंतर पत्नी अनुष्का शर्मावर टीका झाली नाही हे आश्चर्य... कारण, कोहलीच्या अपयशाला नेटिझन्सकडून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कालाच जबाबदार धरले जाते. नेटिझन्सच्या याच दृष्टीकोनावर टेनिसस्टार सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. विराटच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरणे, याला काहीच अर्थ नाही, असे सानिया म्हणाली.
India Economic Summit मध्ये ती म्हणाली की,''विराट कोहली शून्यावर बाद झाला, तर अनुष्का शर्मावर टीका होते. या गोष्टीचा एकमेकांशी काही संदर्भ आहे का? या टीकेमागे काहीच तर्क नाही. आपल्या भारतीय क्रिकेट संघासह दौऱ्यावर असताना अनेकदा त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सना सोबत नसतात. कारण, की खेळाडूंचे लक्ष विचलित होईल. यामागेही काय अर्थ आहे, हे कळले नाही. महिला पुरुषांचे लक्ष विचलित करतात, असे म्हणायचं आहे का?''
सानियानं पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केले आहे आणि सानियालाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सानियानं परखड मत व्यक्त केलं. ती म्हणाली,'' महिला लक्ष विचलीत करतात म्हणजे महिला अबला असतात, असा अर्थ होतो.''
युवराज सिंगच्या 'मेक ओव्हर'ची सानिया मिर्झानं उडवली खिल्ली
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं मेक ओव्हर केले आहे आणि त्यानं या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाकडून खेळत असताना स्टायलिश खेळाडू म्हणून युवी ओळखला जायचा. त्याच्या ड्रेसिंग स्टाईलचीही बरीच चर्चा रंगायची. पण, आताच्या लूकवर भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झानं त्याची खिल्ली उडवली आहे.
युवीनं एक फोटो पोस्ट केल्या, त्यावर लिहिले की,''चिकना चमेला! या लूकचे असेच वर्णय करायला हवे. पण, मी पुन्हा दाढी वाढवू का?'' युवीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला, परंतु सानियानं त्यावरून युवीची फिरकी घेतली. ती म्हणाली,'' पाऊट देऊन गाल लपवण्याचा हा प्रयत्न आहे का? पुन्हा दाढी वाढवं.''
Web Title: Blaming Anushka Sharma when Virat Kohli underperforms 'makes no sense': Sania Mirza
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.