ठळक मुद्देनव्वद पूर्णपणे अंध व अंशतः अंध खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय संघ निवडला जाईलहा संघ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.
मुंबई : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया यांच्या सौजन्याने अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक २२ आणि २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स, मुंबई येथे होणार आहेत.
नव्वद पूर्णपणे अंध व अंशतः अंध खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) यांच्या नियमांतर्गत हे सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय संघ निवडला जाईल. हा संघ राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.
या स्पर्धांमधून खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो तसेच संघ भावना जोपासली जाते. त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव देखील मिळतो. प्रतिभावान खेळाडूंचे सशक्तीकरण आणि संधी यातून उपलब्ध करण्याचा हा प्रयंत्न आहे. पुरुष असो वा महिला यातून त्यांचे जीवन सुधारेल आणि नवीन संधी शोधून त्यांना चांगले भविष्य तयार करण्यास मदत होईल.
Web Title: Blind women's state-level cricket tournaments will start from 22 nov.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.