Blog : ६ चेंडूंत ६ षटकार खाणारा, ते कसोटीत ६००+ विकेट्स! 'दमा' असूनही स्टुअर्ट ब्रॉडने घडवला इतिहास

Stuart Broad annouced retirement : २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंडच्या २१ वर्षीय गोलंदाजाला एका षटकात ६ षटकार खेचले होते आणि तोच गोलंदाज आज कसोटी क्रिकेटमध्ये ६००+ विकेट्स घेऊन निवृत्त होतोय...

By स्वदेश घाणेकर | Published: July 30, 2023 09:24 AM2023-07-30T09:24:00+5:302023-07-30T09:25:01+5:30

whatsapp join usJoin us
Blog : From getting smashed 6 sixes in an over to get 600 test wickets; Who Knew a Man with Asthma Stuart Broad would End Up with 800+ International Wickets | Blog : ६ चेंडूंत ६ षटकार खाणारा, ते कसोटीत ६००+ विकेट्स! 'दमा' असूनही स्टुअर्ट ब्रॉडने घडवला इतिहास

Blog : ६ चेंडूंत ६ षटकार खाणारा, ते कसोटीत ६००+ विकेट्स! 'दमा' असूनही स्टुअर्ट ब्रॉडने घडवला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Stuart Broad annouced retirement :  ७०-८० चा एक काळ होता, जेव्हा गोलंदाजांची हुकूमत होती. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरुप बदलत गेलं अन् क्रिकेट फलंदाज फ्रेंडली झाले.. त्यामुळे गोलंदाजाला नेहमीच दुय्यम वागणुक मिळत आलीय. त्यात एक खराब कामगिरी ही गोलंदाजाचं करियर संपुष्टात आणण्यासाठी पुरेसी ठरते. पण, यातही काही गोलंदाज असे आहेत की ज्यांनी भल्या भल्या दिग्गज फलंदाजांना तालावर नाचवले आहे. यापैकी एक नाव म्हणजेच स्टुअर्ट ब्रॉड... २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगनेइंग्लंडच्या २१ वर्षीय गोलंदाजाला एका षटकात ६ षटकार खेचले होते आणि तोच गोलंदाज आज कसोटी क्रिकेटमध्ये ६००+ विकेट्स घेऊन निवृत्त होतोय...


''उद्या किंवा सोमवारी माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल. हा प्रवास संस्मरणीय होता. या ऐतिहासिक मालिकेतील भाग असल्याचा मला अभिमान आहे आणि मला नेहमीच कारकीर्दिचा शेवट यशशिखरावर असताना करायचा होता,''असे स्टुअर्ट ब्रॉडने Ashes मालिकेतील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकमध्ये सांगितले. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. ४१ वर्षीय जेम्स अँडरसनच्या निवृत्तीच्या चर्चा असताना, ३७ वर्षीय ब्रॉड निवृत्ती जाहीर करून मोकळा झाला होता. २००६ मध्ये वन डे व ट्वेंटी-२० संघातून पदार्पण करणारा ब्रॉड भारतीयांच्या लक्षात आहे तो युवराज सिंगने मारलेल्या ६ षटकारांमुळे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७मध्ये युवीने इंग्लंडच्या गोलंदाजाची बेक्कार धुलाई केली होती.

एखाद्या युवा गोलंदाजाची कारकीर्द संपवण्यासाठी ही गोष्ट पुरेशी होती, परंतु ब्रॉडने त्या अनुभवातून धडा घेतला अन् मागे वळून पाहिले नाही. इंग्लंडचे खेळाडू हे कसोटीवर अधिक प्रेम करणारे आहेत. त्यातलाच हा पठ्ठ्या.. म्हणूनच फक्त १२१ वन डे व ५६ ट्वेंटी-२० खेळून तो थांबला. २०१६ नंतर त्याने संपूर्ण लक्ष कसोटीवर केंद्रीत केले आणि १६७ कसोटींत ६०२* विकेट्स घेतल्या आहेत.  

हॉकीपटू-ओपनर फलंदाज ते जलदगती गोलंदाज....
स्टुअर्ट ब्रॉडने जन्माला येताच मृत्यूला चकवा दिला होता... १२ आठवडे आधी जन्मलेल्या ब्रॉडला जॉन नावाच्या डॉक्टरांनी जीवदान दिले आणि त्यामुळेच त्याने त्याच्या नावातील मधलं नाव जॉन असे ठेवलेय... १६वर्षी त्यानी हॉकीपटू होण्याचे ठरवले अने तो लिसेस्टरशायर आणि मिडलँड्स संघाकडून गोलरक्षक म्हणून खेळला. इंग्लंडच्या संघासाठी त्याने ट्रायलही दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्यासमोर डरहॅम युनिव्हर्सिटी किंवा लिसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब यापैकी एक पर्याय निवडायला सांगितला.


त्याने क्रिकेटची सुरुवात सलामीवीर म्हणून केली. त्याचे वडील ख्रिस ब्रॉड हेही इंग्लंडकडून ओपनर म्हणून खेळले होता. पण, १७व्या वर्षानंतर उंचीमुळे त्याने वेगवान गोलंदाज होण्याचा निर्णय गेतला. तो लिसेस्टरशायर क्लबसोबत वयाच्या ८व्या वर्षापासून होता आणि त्याने संघाकडून ओपनिंगही केली होती. १९९६मध्ये त्याला लिसेस्टरशायर क्लबचा युवा फलंदाज म्हणून पुरस्कारही मिळाला होता.

Stuart Broad holes out to cover, England vs Australia, 5th men
कौंटी क्रिकेट गाजवल्यानंतर त्याला २००६ मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील झालेली धुलाई कारकीर्द उध्वस्त करण्यासाठी पुरेशी होती. पण, चुकांमधून शिकत त्याने पुढे वाटचाल केली. त्याला दम्याचाही त्रास होता, तरीही त्याच्या चेंडूचा वेग काही कमी झाला नाही. Ashes हेच त्याचे पहिले प्रेम राहिले. 


फलंदाज म्हणूनही त्याने पाकिस्तानला आपला हिस्का दाखवला. २०१०च्या लॉर्ड्स कसोटीत त्याने १६९ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती आणि लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या महान फलंदाजांमध्ये ब्रॉडचेही नाव नोंदवले गेले होते. पण, त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर झाला अन् २०१२ मध्ये पुनरागमन करताना वेस्ट इंडिजविरुद्ध ७ २ धावांत ७ विकेट्स घेत ( एकूण ११) पुनरागमन केले. इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसनसोबत १०३७+ विकेट्स घेण्याचा पराक्रम ब्रॉडने केला आहे. 


कसोटी क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक ( वि. भारत, २०११ व वि. श्रीलंका, २०१४) घेणारा तो जगातील चौथा गोलंदाज आहे. २०१३ हे त्याच्या कारकीर्दितील सर्वात यशस्वी वर्ष होतं, कारण त्याने १४ सामन्यांत ६२ विकेट्स घेतल्या. जॉफ्री बॉयकॉट यांनी त्याची तुलना ग्रेट गॅरी सोबर्स यांच्याशी केली होती. २०१५च्या अॅशेस कसोटीत त्याने ट्रेंट ब्रिजवर १५ धावांत ८ विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत ६० धावांत तंबूत पाठवला होता. 


 

Web Title: Blog : From getting smashed 6 sixes in an over to get 600 test wickets; Who Knew a Man with Asthma Stuart Broad would End Up with 800+ International Wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.