Stuart Broad annouced retirement : ७०-८० चा एक काळ होता, जेव्हा गोलंदाजांची हुकूमत होती. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरुप बदलत गेलं अन् क्रिकेट फलंदाज फ्रेंडली झाले.. त्यामुळे गोलंदाजाला नेहमीच दुय्यम वागणुक मिळत आलीय. त्यात एक खराब कामगिरी ही गोलंदाजाचं करियर संपुष्टात आणण्यासाठी पुरेसी ठरते. पण, यातही काही गोलंदाज असे आहेत की ज्यांनी भल्या भल्या दिग्गज फलंदाजांना तालावर नाचवले आहे. यापैकी एक नाव म्हणजेच स्टुअर्ट ब्रॉड... २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगनेइंग्लंडच्या २१ वर्षीय गोलंदाजाला एका षटकात ६ षटकार खेचले होते आणि तोच गोलंदाज आज कसोटी क्रिकेटमध्ये ६००+ विकेट्स घेऊन निवृत्त होतोय...
हॉकीपटू-ओपनर फलंदाज ते जलदगती गोलंदाज....स्टुअर्ट ब्रॉडने जन्माला येताच मृत्यूला चकवा दिला होता... १२ आठवडे आधी जन्मलेल्या ब्रॉडला जॉन नावाच्या डॉक्टरांनी जीवदान दिले आणि त्यामुळेच त्याने त्याच्या नावातील मधलं नाव जॉन असे ठेवलेय... १६वर्षी त्यानी हॉकीपटू होण्याचे ठरवले अने तो लिसेस्टरशायर आणि मिडलँड्स संघाकडून गोलरक्षक म्हणून खेळला. इंग्लंडच्या संघासाठी त्याने ट्रायलही दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्यासमोर डरहॅम युनिव्हर्सिटी किंवा लिसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब यापैकी एक पर्याय निवडायला सांगितला.
त्याने क्रिकेटची सुरुवात सलामीवीर म्हणून केली. त्याचे वडील ख्रिस ब्रॉड हेही इंग्लंडकडून ओपनर म्हणून खेळले होता. पण, १७व्या वर्षानंतर उंचीमुळे त्याने वेगवान गोलंदाज होण्याचा निर्णय गेतला. तो लिसेस्टरशायर क्लबसोबत वयाच्या ८व्या वर्षापासून होता आणि त्याने संघाकडून ओपनिंगही केली होती. १९९६मध्ये त्याला लिसेस्टरशायर क्लबचा युवा फलंदाज म्हणून पुरस्कारही मिळाला होता.
फलंदाज म्हणूनही त्याने पाकिस्तानला आपला हिस्का दाखवला. २०१०च्या लॉर्ड्स कसोटीत त्याने १६९ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती आणि लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या महान फलंदाजांमध्ये ब्रॉडचेही नाव नोंदवले गेले होते. पण, त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर झाला अन् २०१२ मध्ये पुनरागमन करताना वेस्ट इंडिजविरुद्ध ७ २ धावांत ७ विकेट्स घेत ( एकूण ११) पुनरागमन केले. इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसनसोबत १०३७+ विकेट्स घेण्याचा पराक्रम ब्रॉडने केला आहे.