BCCI ने २०२१-२२ मध्ये किती इन्कम टॅक्स भरला? राज्यसभेत विचारला गेला प्रश्न अन् उत्तर मिळालं... 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:11 PM2023-08-08T22:11:43+5:302023-08-08T22:12:43+5:30

whatsapp join usJoin us
Board of Control for Cricket in India (BCCI) paid Rs 1,159 crore income tax in 2021-22 — 37% higher than last year | BCCI ने २०२१-२२ मध्ये किती इन्कम टॅक्स भरला? राज्यसभेत विचारला गेला प्रश्न अन् उत्तर मिळालं... 

BCCI ने २०२१-२२ मध्ये किती इन्कम टॅक्स भरला? राज्यसभेत विचारला गेला प्रश्न अन् उत्तर मिळालं... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. आयसीसीच्या एकूण महसुलातील जवळपास ३९ टक्के म्हणजेच वर्षाला २००० कोटी रुपये हे बीसीसीआयला मिळताय.. आयपीएल, मीडिया राईट्स, स्पॉन्सर, जर्सी टायटल स्पॉन्सर यातूनही बीसीसीआयला हजारो कोटी मिळतात. त्यामुळेच २०२१-२२ मध्ये बीसीसीआयने किती इन्कम टॅक्स ( Income Tax) भरला असा प्रश्न राज्यसभेत विचारला गेला. 


राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. बीसीसीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११५९ कोटी टॅक्स भरल्याची माहिती दिली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ३७ टक्के जास्त आहे. बीसीसीआयने २०२०-२१ मध्ये ८४४.९२ कोटी इन्कम टॅक्स भरला होता आणि त्याआधी २०१९-२० मध्ये ८८२.२९ कोटींचा टॅक्स भरला होता. त्यापूर्वी २०१९ मध्ये ८१५.०८ कोटी व २०१७-१८मध्ये ५९६.६३ कोटी इन्कम टॅक्स भरला होता. बीसीसीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७६०६ कोटींचा महसूल कमावला आणि त्याचा खर्च हा ३०६४ इतका झाला. २०२०-२१मध्ये ४७३५ कोटीच्या महसूलातील ३०८० रुपये खर्च केले होते. 

Web Title: Board of Control for Cricket in India (BCCI) paid Rs 1,159 crore income tax in 2021-22 — 37% higher than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.