Join us  

मोठा खेळ झाला? Sourav Gangulyला अध्यक्षपदावर राहायचं होतं कायम, IPL चेअरमनपदाची दिलेली ऑफर, पण...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI Election) मध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 9:21 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI Election) मध्ये नवनवीन ट्विस्ट येताना दिसतोय. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) हा पदावर कायम राहणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी ( Roger Binny) हे BCCI चे नवे अध्यक्ष असतील असा दावा केला जातोय. जय शाह हे सचिवपदी कायम राहणार आहेत आणि अरुण धुमाळ यांचे खजिनदारपद भाजपा नेते आशिष शेलार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कामावर सदस्य खूश नसल्याचे वृत्त समोर येतेय. गांगुलीला अध्यक्षपदावर कायम राहायचे होते, परंतु त्याला दुसरी संधी देण्याची सदस्यांची इच्छा नव्हती. 

BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम 

PTI ने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीला इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु माजी कर्णधाराने ती स्वीकारण्यास नकार दिले. ''सौरव गांगुलीला आयपीएल चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु त्याने नम्रपणे ती नाकारली. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्याखालील आयपीएल चेअरमनपद स्वीकारू शकत नाही, असे त्यामागचे त्याचे लॉजिक होते. त्याने बीसीसीआय अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली,''असे बीसीसाआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.  

२०१९मध्ये गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली. ऑक्टोबर २०१९मध्ये जय शाह सचिव म्हणून दाखल झाले. मागील तीन वर्ष ही दोघं बीसीसाआयचे काम पाहत आहेत  आणि कोरोना काळात त्यांनी आयपीएलचे आयोजन करण्याचे शिवधनुष्य पेलले. ICCमध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून गांगुलीचे नाव आघाडीवर आहे. आयपीएलच्या चेअरमनपदी सध्याचे BCCI खजिनदार अरुण धुमाळ यांचे नाव आघाडीवर असून भाजपा नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्याकडे BCCIचे खजिनदारपद जाण्याची शक्यता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयजय शाहआशीष शेलार
Open in App