Join us

India vs South Africa : दोन चेंडूंचा सामना अन् भोपळा न फोडताच रोहित माघारी परतला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : लोकेश राहुलला कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रोहित शर्माला ओपनिंगची संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 11:27 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : लोकेश राहुलला कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रोहित शर्माला ओपनिंगची संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कसोटीत आतापर्यंत 5व्या व 6व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला उतरणार आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 सामने आणि कसोटी यात खूपच फरक असल्यानं रोहितवर प्रचंड दडपण असेल असा अंदाज बांधला जात आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अध्यक्षीय एकादश संघ मैदानात उतरला आणि त्यात रोहितने सलामी केली. मात्र, अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून रोहित माघारी परतला.

तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसात फॅफ ड्यु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम ( 100), टेंबा बवुमा ( 87*) आणि वेर्नोन फिलेंडर ( 48) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेनं 6 बाद 279 धावांत डाव घोषित केला. धमेंद्रसिंग जडेजानं ( 3/66) सर्वाधिक विकेट घेतल्या. 

त्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. रोहित आणि मयांक अग्रवाल हे सलामीला आले. सलामीवीर म्हणून कसोटीत रोहितची कामगिरी कशी होते याची उत्सुकता होती. पण, दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित खाते न उघडता माघारी परतला. फिलेंडरने त्याला क्लासेनकरवी झेलबाद केले.

India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनदुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनतिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

  • भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल.

 

  • दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड. 
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मा