Shah Rukh Khan KKR IPL 2022 : हारकर भी जीतने वालों को बाज़ीगर कहते है!; शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना खास संदेश 

राजस्थानच्या २१७ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला २१० धावा करता आल्या. युजवेंद्र चहलने टाकलेल्या १७व्या षटकाने सामन्याला कलाटणी दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:54 PM2022-04-19T16:54:14+5:302022-04-19T16:57:42+5:30

whatsapp join usJoin us
Bollywood Superstar Shah Rukh Khan pens uplifting message for his team Kolkata Knight Riders after defeat by Rajasthan Royals in IPL 2022  | Shah Rukh Khan KKR IPL 2022 : हारकर भी जीतने वालों को बाज़ीगर कहते है!; शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना खास संदेश 

Shah Rukh Khan KKR IPL 2022 : हारकर भी जीतने वालों को बाज़ीगर कहते है!; शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना खास संदेश 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022)  कोलकाता नाईट रायडर्सला सोमवारी अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून ७ धावांनी हार मानावी लागली. राजस्थानच्या २१७ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला २१० धावा करता आल्या. युजवेंद्र चहलने टाकलेल्या १७व्या षटकाने सामन्याला कलाटणी दिली. त्याने त्या षटकात हॅटट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. KKRच्या पराभवानंतर बॉलिवूड सुपरस्टार व सह मालक शाहरूख खान ( Shah Rukh Khan ) याने संघाचे मनोबल वाढवणारे ट्विट केले. KKRने काल पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली.  

या पराभवामुळे मनोबल खचलेल्या खेळाडूंना धीर देण्यासाठी शाहरुखनने ट्विट केले. त्यात त्याने खेळाडूंनी विजयासाठी केलेल्या संघर्षाचे जोरदार कौतुक केले आणि या पराभवाने खचू नका असेही म्हटले. त्याने लिहिले की,''तुम्ही सर्वजणं चांगले खेळलात. श्रेयस अय्यर, आरोन फिंच आणि उमेश यादव यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  सुनील नरिनला १५०व्या आयपीएल सामन्यासाठी शुभेच्छा आणि ब्रेंडन मॅक्युलमने १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अविश्वसनीय खेळी केली होती, त्याचेही अभिनंदन. मला माहित्येय आपण हरलोय, परंतु असे लढून हरण्यात काहीच वाईट नाही. खचून जाऊ नका. ''


राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर ( १०३), देवदत्त पडिक्कल ( २४), संजू सॅमसन ( ३८) आणि शिमरोन हेटमायर ( २६) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर २१७ धावा कुटल्या. त्यानंतर कोलकातानेही दमदार सुरूवात केली. आरोन फिंच ( ५८) व श्रेयस अय्यर ( ८५) यांनी संघाला जवळपास विजय मिळवून दिलाच होता. पण, १७व्या षटकात युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या आणि KKRला ७ धावांनी हार मानावी लागली. 

Web Title: Bollywood Superstar Shah Rukh Khan pens uplifting message for his team Kolkata Knight Riders after defeat by Rajasthan Royals in IPL 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.