अफगाणिस्तानच्या काबुल शहरात धक्कादायक घटना घडली. अफगाणिस्तानच्या काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शपागीजा क्रिकेट लीग ट्वेंटी-20 स्पर्धेदरम्यान बॉम्ब ब्लास्ट झाला. सर्व खेळाडूंना सुरक्षित बंकरमध्ये नेण्यात आले, परंतु प्रेक्षकांमधील काही जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंद-ए-आमीर ड्रगन्स व पामिर झालमी यांच्यातल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. पाकिस्तानचा एक खेळाडूही या सामन्यात खेळत होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून दरवर्षी शपागीजा क्रिकेट लीग ट्वेंटी-20 स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत 8 फ्रँचायझींचा समावेश असतो आणि यात राष्ट्रीय खेळाडूंसह A टीम मधील व 19 वर्षांखालील संघातील खेळाडूही खेळतात.'' शपागीजा क्रिकेट लीग ट्वेंटी-20 च्या सामन्या दरम्यान हा ब्लास्ट झाला. चार लोकं गंभीर जखमी झाल्याचे, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी नसीब खान यांनी सांगितले.
Web Title: Bomb blast in Kabul Cricket Stadium during Afghanistan T20 tournament, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.