सिडनी - आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर याने आपल्यावर घातलेल्या एका वर्षाच्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणार नसल्याची घोषणा केली आहे. तसेच या काळात तो चांगला खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल, असे वॉर्नर म्हणाला.
बंदीविरोधात अपिलाची मुदत संपण्याच्या आधी वॉर्नरने ही घोषणा केली. याआधी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अष्टपैलु खेळाडू कॅमेरुन बेनक्राफ्ट यांनी ही घोषणा केली होती. दक्षीण आफ्रिकेत झालेल्या चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वॉर्नर, स्मिथवर एका वर्षाची तर बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली. त्यांच्याकडे बंदी विरोधात अपिल करण्याची संधी होती. मात्र त्यांनी शिक्षेचा स्विकार केला आणि बंदीला आव्हान दिले नाही. वॉर्नर याने टिष्ट्वटर म्हटले की,‘ मी क्रिकेट आॅस्ट्रेलियाला सांगितले आहे की, माझ्यावर लावलेल्या बंदीचा पुर्णपणे स्विकार करतो. मला माझ्या कृत्याची लाज वाटत आहे. मी आता एक चांगला माणुस, संघ सदस्य बनण्यासाठी प्रयत्न करेल.’ (वृत्तसंस्था)
वॉर्नरची कमतरता जाणवणार नाही - मुडी
हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी सांगितले की, ‘हैदराबादचा मुख्य फलंदाज डेविड वॉर्नर याची
कमतरता त्यांना जाणवणार नाही.कारण हैदराबादचा संघ खुपच संतुलित आहे.’ मुडी यांच्या मते त्यांना माजी कर्णधाराची
कमतरता जाणवणार नाही. सनरायजर्सने नियमीत कर्णधार वॉर्नरच्या जागी न्युझिलंडच्या केन विल्यमसन याला कर्णधार म्हणून नेमले आहे. बीसीसीआयने वॉर्नरला आयपीएल ११ मधून बाहेर केले आहे.
Web Title: Bondi will not challenge - Warner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.