विश्वचषकातील सामन्यांवर सट्टेबाजी; हॉटेलमधून बुकींना अटक

ग्रॅण्ट रोडवरील हॉटेलवर छापा; मुंबई पोलिसांची पहिली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:51 PM2019-06-23T20:51:09+5:302019-06-23T20:55:14+5:30

whatsapp join usJoin us
bookies arrested for betting in World Cup match of India | विश्वचषकातील सामन्यांवर सट्टेबाजी; हॉटेलमधून बुकींना अटक

विश्वचषकातील सामन्यांवर सट्टेबाजी; हॉटेलमधून बुकींना अटक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा घेणारे रॅकेट मुंबई पोलिसांनी शनिवारी उध्वस्त केले असून आतापर्यंत त्यांच्याकडून तब्बल १४ कोटींचे बेटींग घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका परप्रांतीयासह दोघा बुकींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.

विश्वास किशन टाकलकर (वय ५१, महापालिका चाळ, मुसाफिर खाना, मुंबई) व अजय कांतराज(२४ रा.एअर पोर्ट रोड, बंगळूर) अशी त्यांची नावे असून ग्रॅण्ट रोडवरील हॉटेल बलवास येथे दोघेजण न्युझीलंड व वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या मोबाईलवर ते बेटींग घेत होते.


इंग्लडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यावरील बेटींगची ही मुंबईतील पहिलीच कारवाई आहे. दोघा बुकींकडून रोख रक्कमेसह अडीच लाखाचा ऐवज जप्त केला असून त्यांनी एकुण १४ कोटीचे बेटींग घेतल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून याबाबत डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अंमली पदार्थ विक्री विरोधात धडाकेबाज कारवाया करणाऱ्या उपायुक्त लांडे यांना पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शहरातील अनाधिकृत व बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करण्याची सूचना केली आहे. खेतवाडीतील बाराव्या गल्लीतील हॉटेल बलवासच्या रुम नं.२०३ मध्ये न्यूझीलंड व वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी निरीक्षक प्रविण कदम, शंशाक शेळके, सहाय्यक निरीक्षक उमेश सावंत, उपनिरीक्षक भोसलेसह हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी दोघेजण मोबाईलवर विविध ठिकाणाहून आलेले कॉल घेत बेटिगच्या नोंदी घेत होते. त्यांच्याजवळ ८ मोबाईल, एलसीडी टीव्ही व रोख ९ हजार ४७० रुपये सापडले. त्याचा मुख्य बुकींचा शोध घेण्यात येत आहे.



दहा दिवसात १४ कोटींचे बेटींग
दोघा बुक्कीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी १२ जूनपासून दहा दिवसामध्ये विश्वचषकातील विविध सामन्यावर तब्बल १४ कोटीचे बेटीग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक बेटीग घेण्यात आले होते. देशभरातील विविध ठिकाणाहून ते मोबाईलवर सट्टा घेत होते.



प्रत्येक चेंडूवर सट्टा
विश्वचषकातील प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर सट्टयाचे दर कमी जास्त करुन घेण्यात येत होते. मुख्य सूत्रधार असलेल्या बुकीच्या सूचनेनुसार ते बेटीगचा दर गिऱ्हाईकांना सांगत असत. या रॅकेटमध्ये त्यांचे आणखी काही साथीदाराचा समावेश असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.





 

Web Title: bookies arrested for betting in World Cup match of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.