- व्हीव्हीएस लक्ष्मण
रणनीतीचा विचार करता आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ वरचढ ठरला. गोलंदाजीत भेदकता, फलंदाजीमध्ये आक्रमकता व रोहित शर्माचे प्रेरणादायी नेतृत्व या जोरावर भारताने वर्चस्व गाजवले. सुपर फोरची एक लढत शिल्लक असताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाल्याने मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतावर कुठले दडपण नसेल. मनोधैर्य उंचावलेला संघ मात्र या लढतीत प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. भारताच्या अपराजित मोहिमेत गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यात जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले आहे. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बळी घेणाऱ्या निर्धाव चेंडूपेक्षा दुसरा कुठला चांगला निर्धाव चेंडू नसतो. नव्या चेंडूने मारा करणाºया वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघांना धक्का देण्याची रणनीती अवलंबली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ सुरुवातीपासून दडपणाखाली असतो. मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हणजे फलंदाजांचे वर्चस्व, पण येथे गोलंदाजांचे वर्चस्व बघून चांगले वाटले. त्यामुळे फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार नाही, याची खात्री पटली.
येथील उष्ण वातावरणात बुमराहची कामगिरी कौतुकास्पद आहे. या वातावरणातही त्याची भेदकता कमी झाली नाही. पहिल्या स्पेलमध्ये वेगवान मारा करणाºया बुमराहचे अखेरच्या स्पेलमध्ये यॉर्कर बघण्यासारखे असतात. डेथ ओव्हर्समध्ये अचूक टप्प्यावर सातत्याने मारा करणे सोपे नसते. तंदुरुस्ती, सराव व निर्धार हे त्याच्या यशाचे रहस्य आहे.
जडेजामुळे भारताच्या गोलंदाजीला व क्षेत्ररक्षणाला आणखी बळकटी आली. त्यामुळे भारतीय संघात पाच स्पेशालिस्ट गोलंदाज राहणार हे निश्चित झाले. तसेच केदार जाधवचा पर्यायही वापरण्याची संधी असते. हार्दिक पांड्या तंदुरुस्त झाल्यानंतर कर्णधाराला आणखी एक पर्याय मिळेल. विश्वचषक स्पर्धेसाठी हे महत्त्वाचे आहे. इंग्लंडमध्ये पांढºया चेंडूने खेळताना गोलंदाजीत कल्पकता असावी लागते. गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत याची प्रचिती आली.
रोहित ज्या पद्धतीने नेतृत्व करीत आहे, ते कौतुकास्पद आहे. त्याची रणनिती, लवचिकता व निर्णय क्षमता शानदार आहे. तो गोलंदाजीत करीत असलेले बदल आणि त्याची बेदरकार वृत्ती संघासाठी लाभदायक ठरली आहे. शिखर धवनसोबत त्याने सलामीला खेळताना संघाला नेहमी चांगली सुरुवात करून दिली आहे.
Web Title: A boomerah impressed in a warm environment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.