KL Rahul, Rishabh Pant Practice Session Ahead Perth Test: भारतीय संघ २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानातून आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या कसोटी सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडूंनी कसून सराव केल्याचे पाहायला मिळाले. पर्थ येथील WACA ग्राउंडवर लोकेश राहुलसहरिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांची नेट्समध्ये सराव करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. पण ऑस्ट्रेलियातील पहिल्या दिवसाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहलीची झलक काही दिसली नाही.
सर्वात आधी ऑस्ट्रेलियात पोहचला, पण पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराटची झलक नाही दिसली
विराट कोहली हा संघातील खेळाडूंच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचला होता. फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियात एन्ट्री मारल्यावर ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी किंग कोहलीला फुटेज दिल्याचा सीनही पाहायला मिळाला. पण प्रॅक्टिस सेशनमध्ये तो मागेच राहिल्याचा सीन समोर येणाऱ्या फोटोतून दिसून येत आहे. विराट कोहलीशिवाय अन्य काही खेळाडू आहेत जे पहिल्या दिवसाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये दिसले नाहीत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होताना जसा दोन गटात विभागून गेला अगदी तोच पॅटर्न प्रॅक्टिस सेशनमध्ये असू शकतो. कदाचित त्यामुळेच सर्वात आधी ऑस्ट्रेलियात पोहचूनही विराट प्रॅक्टिस सेशनला दिसला नसावा, असा एक सीन त्यामागे असू शकतो.
केएल राहुलचा कसून सराव
केएल राहुल आणि ध्रुव जुरेल ही दोघे टीम इंडियातील अन्य खेळाडूंसह विराट कोहलीच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचली होती. दोघांनी भारत 'अ' संघाकडून ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामनाही खेळला. पण या सामन्यात लोकेश राहुलचा फॉर्म काही दिसला नाही. एका बाजूला जुरेल ध्रुवनं लढवय्या वृत्ती दाखवून ८० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल मात्र दोन्ही डावात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लोकेश राहुलनं पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये कसून सराव करताना दिसला.
केएल राहुलला संधी मिळणार का?
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं हे लोकेश राहुलसाठी चॅलेंजिंग आहे. पण गौतम गंभीरनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पुढच्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला प्रमोशन मिळेल, असे संकेत दिले आहेत. ही संधी मिळाली तर ती वाया जावू नये, यासाठी तो मेहनत घेताना दिसून आले.