क्रिकेट जगतामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेला अॅशेस इतकंच महत्त्व दिलं जातं. मागच्या काही दशकांपासून दोन्ही संघामध्ये अनेक चुरशीच्या कसोटी मालिका झाल्या आहेत. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील हंगामातील सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणं जाहीर केली आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघांमध्ये या वर्षाच्या अखेरीस प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी या मालिकेत ५ कसोटी सामने खेळवले जातील. या मालिकेतील एक कसोटी सामना हा दिवस-रात्र पद्धतीने खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा सुमारे २ महिने चालणार आहे. पर्थ येथून या दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना हा २२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर अॅडिलेड येथे दुसरा सामना खेळवला जाईल. हा सामना दिवस-रात्र प्रकारामध्ये खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरू होईल. तस चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाईल. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना हा ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळळवण्यात येणार आहे.
या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ३२ वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. याआधी १९९१-९२ च्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले गेले होते. त्या मालिकेत भारताला ०-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पहिला कसोटी सामना - २२ ते २६ नोव्हेंबर - पर्थ दुसरा कसोटी सामना - ६ ते १० डिसेंबर - अॅडिलेडतिसरा कसोटी सामना - १४ ते १८ डिसेंबर - ब्रिस्बेन चौथा कसोटी सामना -२६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न पाचवा कसोटी सामना - ३ ते ७ जानेवारी - सिडनी