गुवाहाटी : भारताविरुद्ध दुस-या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणा-या आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर मंगळवारी रात्री दगड फेकण्यात आला. त्यामुळे पाहुण्या संघातील खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे.
या हल्ल्यानंतर आॅस्ट्रेलियन संघाच्या बसच्या खिडकीचे तावदान तुटले. पाहुण्या संघाने भारताविरुद्ध दुसºया टी-२० सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधल्यानंतर ही घटना घडली.
घटनेत सुदैवाने कुणा खेळाडूला दुखापत झाली नाही. कारण खिडकीजवळच्या आसनावर कुणी बसलेले नव्हते. पण, या घटनेमुळे आसाम क्रिकेट संघटना आणि बारसपारामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यासाठी राज्य पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी टिष्ट्वट केले की, ‘एका शानदार लढतीनंतर ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे गुवाहाटीच्या क्रीडानगर म्हणून निर्माण होत असलेल्या प्रतिमेला धक्का बसला. आम्ही याची कठोर शब्दांत निंदा करतो. आम्ही त्यासाठी क्षमा मागतो. आसामचे नागरिक कधीच अशा प्रकारच्या वर्तनाचे समर्थन करीत नाही. आम्ही दोषींना शिक्षा देऊ.’ (वृत्तसंस्था)
पाहुण्या खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची-
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाहुण्या संघातील खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
राठोड यांनी टिष्ट्वटरवर पोस्ट केले की, ‘गुवाहाटीमध्ये दगडफेकीची घटना आमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे, पण आॅस्ट्रेलियन संघ आणि फिफा सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी आहेत.’
आसाम क्रिकेट संघटनेचे सचिव बुरागोहेन यांनी सांगितले की, ‘आम्ही फुलप्रूफ सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याचा प्रयत्न केला, पण हे कसे घडले याची कल्पना नाही. स्टेडियमजवळ गर्दीच्या मार्गावर हे घडले नसून संघाच्या हॉटेलजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. भविष्यात अशी घटना घडणार नाही, असे आश्वासन देतो.’
भारताचा सीनिअर खेळाडू
रविचंद्रन आश्विन याने या घटनेची निंदा करताना चाहत्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
आम्ही दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यास वचनबद्ध आहोत. चौकशी सुरू असून पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे.
-सर्बानंद सोनोवाल
Web Title: Both of them arrested in connection with the stone-throwing incident on Australian bus service, the investigation started
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.