OMG; स्वतःच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी खेळाडू १०० मीटर पर्यंत धावला अन्...

३० सेकंदाच्या या व्हिडीओत गोलंदाजानं फलंदाजाला केलंलं कॉट अँड बोल्ड सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 9, 2020 04:20 PM2020-10-09T16:20:15+5:302020-10-09T16:20:52+5:30

whatsapp join usJoin us
Bowler runs 100 meter to complete caught and bowled video goes viral | OMG; स्वतःच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी खेळाडू १०० मीटर पर्यंत धावला अन्...

OMG; स्वतःच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी खेळाडू १०० मीटर पर्यंत धावला अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वात फॅफ ड्यू प्लेसिस, रवींद्र जडेजा, अनुकूल रॉय आदींच्या अविश्वसनीय कॅचने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यात सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या दोन सामन्यांनी चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवली आहे. चौकार- षटकारांच्या आतषबाजीनं क्रिकेट प्रेमी मंत्रमुग्ध झाले आहेत. पण, IPL वगळता सध्या सोशल मीडियावर एका कॅचने धुमाकूळ घातला आहे. 

३० सेकंदाच्या या व्हिडीओत गोलंदाजानं फलंदाजाला केलंलं कॉट अँड बोल्ड सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्मी कमांडर ट्वेंटी-20 लीगमधील हा सामना आहे. यात एका फलंदाजांना मिड विकेटच्या दिशेनं चेंडू टोलावला आणि गोलंदाजानं जवळपास १०० मीटर पर्यंत धाव घेत डाईव्ह मारून तो चेंडू सुरेखरितीनं टिपला. हा चेंडू टिपण्यासाठी दोन खेळाडू मिड विकेटच्या दिशेनं धावले होते. पण, गोलंदाजाच्या या सुपर कॅचनं त्यांनाही थक्क केलं.  

पाहा व्हिडीओ...


प्राइम स्टेला ईस्टर्न वॉरियर्स आणि सुपर फॅशन नॉर्दन वॉरियर्स यांच्यातला हा सामना होता. ही कॅच घेणाऱ्या गोलंदाजाचं नाव थेनू रतन असे आहे आणि त्यानं आशन रणदिका ( ८) याला बाद केले.  

Web Title: Bowler runs 100 meter to complete caught and bowled video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.