Join us  

नादच खुळा! W,W,W,W,W,W...एकाच षटकात ६ विकेट्सचा विक्रम; पाहा Video

क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. यात केव्हाही काही होऊ शकतं आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होताना दिसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 4:52 PM

Open in App

क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. यात केव्हाही काही होऊ शकतं आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होताना दिसते. दररोज नवे विक्रम रचले जातात आणि दुसऱ्या दिवशी मोडलेही जातात. सध्याच्या ट्वेन्टी-२० च्या जमान्यात क्रिकेट फलंदाजांचा खेळ समजला जातो. आता पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटीची परिस्थिती पाहा इथं फलंदाजांनी एकाच दिवसात ५०० धावांचा डोंगर उभारला व नवा विक्रम रचला. तर काही दिवसांपूर्वी विजय हजारे करंडक स्पर्धेत मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडनं एकाच षटकात सात षटकार खेचत नव्या विक्रमाची नोंद केली. पण गोलंदाजीत तुम्हा असा विक्रम कधी ऐकलाय का? आता गोलंदाजानंही ही कमाल करुन दाखवली आहे. एका गोलंदाजानं एकाच षटकात सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत असं होऊ शकलेलं नाही. पण महाराष्ट्रातील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटच्या एका स्पर्धेत हा पराक्रम एका गोलंदाजानं केला आहे. पनवेलमध्ये खेळवल्या गेलेल्या एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजानं एकाच षटकात सहा फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 

सामन्याच्या पहिल्याच षटकात केली कमालपनवेलच्या उसराई खूर्द येथे खेळवल्या गेलेल्या गावदेवी उसराई चषक २०२२ मध्ये लक्ष्मण नावाच्या गोलंदाजानं एकाच षटकात सहा चेंडूवर सहा विकेट्स मिळवल्या. डोंडराचापाडा विरुद्ध गावदेवी पेठ संघात सामना रंगला होता. डोंडराचापाडा संघाला विजयासाठी ४३ धावांची गरज होती. पण पहिल्याच षटकात संघाचे सहा फलंदाज माघारी परतले. या षटकात लक्ष्मण नावाच्या गोलंदाजानं एकही धाव दिली नाही. गोलंदाजानं पाचव्या चेंडूवर पाचवी विकेट क्लीन बोल्ड करत मिळवली. तर सहावी विकेट एलबीडब्लूच्या माध्यमातून मिळवली आणि स्पर्धेतील विक्रम प्रस्थापित केला. 

महत्वाची बाब म्हणजे एकाच षटकात ६ विकेट्स मिळवण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात असा कारनामा गोलंदाजानं याआधीही केला आहे. २६ जानेवारी २०१७ मध्ये इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार एलेड कॅरीनं नावाच्या गोलंदाजानं गोल्डन पॉइंट क्रिकेट क्लबकडून खेळताना एकाच षटकात सहा विकेट्स घेतल्या होत्या. 

Open in App