Join us  

इंग्लंडमधील गोलंदाजीचा लाभ झाला: बुमराह

तिसºया दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर बुमराह म्हणाला,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 6:47 AM

Open in App

किंग्स्टन: इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूने मारा करण्याचा अनुभव वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केली आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या बुमराहने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह सहा गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक साधणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज बनला. पहिल्या कसोटीतही बुमरहाने सात धावांत पाच फलंदाज बाद केले होते. या सामन्यात १२.२ षटकात त्याने सहा फलंदाजांना बाद केले.

तिसºया दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर बुमराह म्हणाला,‘ मी इंग्लंडमध्ये जे कसोटी सामने खेळलो त्यात ड्यूक चेंडूने मारा केला. यामुळे चेंडूला फार वळण मिळते. गोलंदजांमध्ये इनस्विंग आणि आऊटस्विंग मारा करण्याचा आत्मविश्वास वाढतो. मला याच अनुभवाचा लाभ झाला.’ भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा सफाया करण्याच्या जवळपास पोहोचला. भारताच्या ४६८ धावांचा पाठलाग करणाºया विंडीजने दुसºया डावात ४५ धावात दोन गडी गमावले आहेत. भारतीय संघाच्या डावपेंचाबाबत बुमराह म्हणाला,‘ पहिल्या डावात यजमान संघावर दडपण आणण्याचे लक्ष्य आखले होते. त्यात आम्ही पूर्ण यशस्वी ठरलो. विकेट आणि परिस्थितीचे आकलन करीत मारा केला. येथे खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने आखूड टप्प्याचे चेंडू टाकून फलंदाजांना चुकीचे फटके मारण्यास प्रवृत्त केले. अचूक टप्प्यावर मारा केल्याचा लाभ मिळाला.’ 

 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज