Join us  

महेंद्रसिंग धोनी, स्वातंत्र्य सैनिक! झारखंडच्या मुलाचा Viral Video पाहून लोकांनी डोक्यावर मारला हात

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचे फॅन फॉलोअर्स किती आहेत,  हे वेगळं सांगयला नको.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 3:14 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचे फॅन फॉलोअर्स किती आहेत,  हे वेगळं सांगयला नको. निवृत्तीनंतरही सोशल मीडियावर त्याचीच चर्चा असते. अनेक तरुण धोनीला आपला आदर्श मानतात. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. पण, क्रिकेटपटू धोनीला एका युवकाने स्वातंत्र्य सैनिक म्हटले आहे. झारखंडमधील एक व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि त्यात त्याने स्वातंत्र्य सैनिक म्हणून घेतलेली नावं लोकांना डोक्यावर हात मारण्यास भाग पाडताना दिसत आहेत. 

भौकाल टीव्हीच्या नावाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रिपोर्टर काही मुलांना पाच स्वातंत्र्य सैनिकांची नावं सांगण्यास सांगतोय. तिरंगा हाती घेतलेल्या मुलाने पहिलं नाव बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचं घेतलं आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीलाही त्याने स्वातंत्र्य सैनिक बनवलं. धोनी स्वातंत्र्य सैनिक कसा, असे जेव्हा त्या मुलाला विचारले गेले, तेव्हा त्याने सांगितले की धोनी भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे आणि त्याने झारखंडचं नाव रोशन केलं आहे.  

धोनीनंतर या मुलाने बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे नाव स्वातंत्र्य सैनिक म्हणून घेतले. त्यामागेही त्या मुलाने कारण सांगितले की, तुम्ही त्याचा चित्रपट माँ तुझे सलाम पाहिला आहे ना, त्यात तो डायलॉग मारतो ना दूध मांगो खीर देंगे, कश्मीर मांगो चीर देंगे, म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक आहे. त्या मुलाने भोजपूरी अभिनेता आणि निरहुआ व खेसारीलाल यादव यांचाही या लिस्टमध्ये समावेस केला.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसोशल व्हायरल
Open in App