Join us  

बॉलिवूडवरील 'Boycott'चं लोण क्रिकेटपर्यंत आलं; Sourav Ganguly मुळे सुरू झालाय ट्रेंड, CBI चौकशीची मागणी!

#BoycottLegendsLeagueT20 : सध्या सोशल मीडियावर Boycott हा शब्द जास्त चर्चिला जात आहे... आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा पासून सुरू झालेल्या या ट्रेंडचा फटका तापसी पन्नूच्या दोबारा आदी बॉलिवूडच्या चित्रपटांनाही बसताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:11 PM

Open in App

#BoycottLegendsLeagueT20 : सध्या सोशल मीडियावर Boycott हा शब्द जास्त चर्चिला जात आहे... आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा पासून सुरू झालेल्या या ट्रेंडचा फटका तापसी पन्नूच्या दोबारा आदी बॉलिवूडच्या चित्रपटांनाही बसताना दिसतोय. पण, आता हे लोण क्रिकेटमध्येही आलं आहे.. शुक्रवारी सोशल मीडियावर #BoycottLegendsLeagueT20 हा ट्रेंड सुरू होता आणि त्यामागे कारणीभूत BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव BCCI च्या अध्यक्षपदावर असूनही या लीगमध्ये खेळतोय कसा हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.  

Legends League T20 लीगमध्ये गांगुली इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याच्याकडे वर्ल्ड जायंट्सचे कर्णधारपद आहे. या लीगमध्ये आशियाई संघही असणार आहे आणि त्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावरून आधीच टीका सुरू आहे. पण, सध्या गांगुलीच्या या लीगमधील समावेशाबाबत टीका सुरू आहे. BCCI चा अध्यक्ष असूनही एका खाजगी लीगमध्ये गांगुली कसा खेळू शकतो आणि त्यासाठी पैसे कसे घेऊ शकतो, असा सवाल केला जात आहे. यातून Conflict of Interest ( हितसंबंध जपणे) चा मुद्दाही उपस्थित होत आहे. पण, गांगुली पैसे घेणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. 

पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे  Legends League Cricket T20 (LLC T20) चे संस्थापक व MD रमण रहेजा यांना ICC ने २०१९मध्ये आर्थिक अनियमितता राखल्याने ब्लॅकलिस्ट केले होते. मग अशा व्यक्तीच्या लीगमध्ये BCCI अध्यक्ष  व अन्य भारतीय खेळाडू कसे खेळतात, हा प्रश्न नेटिझन्स  विचारत आहे. काहींनी तर याची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीसोशल मीडियाबीसीसीआय
Open in App