भारतीय खेळाडूंकडून बॉयकॉटची धमकी?; ऑस्ट्रेलियन नेत्या म्हणाल्या,"... तर येऊच नका"

Aus Vs. Ind : ब्रिसबेनमधील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी क्वारंटाईन होण्याच्या शक्यतेवरून भारतीय खेळाडू नाराज असल्याचं ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटलं होतं.

By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 05:07 PM2021-01-03T17:07:14+5:302021-01-03T17:09:03+5:30

whatsapp join usJoin us
Boycott threats from players; Australian leader says "... then don't come" | भारतीय खेळाडूंकडून बॉयकॉटची धमकी?; ऑस्ट्रेलियन नेत्या म्हणाल्या,"... तर येऊच नका"

भारतीय खेळाडूंकडून बॉयकॉटची धमकी?; ऑस्ट्रेलियन नेत्या म्हणाल्या,"... तर येऊच नका"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील मंत्र्यांनीही दिला नियमांचं पालन करण्याचा इशारा

सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून दोन्ही संघांनी एक-एक सामन्यात विजय मिळवला आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिसबेनमध्ये खेळवला जाणार आहे. परंतु भारतीय संघाचे खेळाडूंनी पुन्हा एकदा क्वारंटाइन होण्याच्या शक्यतेवरून नाराजी व्यक्ती केली आहे. अशातच क्विन्सलँड असेंबलीच्या सदस्या रॉस बेट्स यांनी जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी येऊच नये," अशा शब्दांत इशारा दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ब्रिसबेनमधील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी क्वारंटाईन होण्याच्या शक्यतेवरून नाराज असल्याचं ऑस्ट्रेलियातील काही माध्यमांच्या अहवालातून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर या मालिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा क्वारंटाइन होण्यास विरोध केला असल्याचं ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं होतं. तसंच गेल्या सहा महिन्यांपासून सतत क्वारंटाइनच्या नियमांचा सामना करत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं असल्याचंही ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटलं होतं. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रवक्त्यानं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

"जर भारतीय नियमांनुसार राहणार नसतील तर त्यांनी येऊच नये," असा इशारा रॉस बेट्स यांनी दिला. तसंच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरू यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे. तर दुसरीकडे क्विन्सलँडच्या क्रीडा मंत्र्यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. "प्रत्येकाला या ठिकाणी समान नियम लागू होतात. भारतीयांनाही क्वारंटाइनचे नियम मोडण्याचा कोणताही अधिकार नाही. जर भारतीय खेळाडूंना ब्रिसबेनमध्ये नियमांचं पालन करायचं नसेल तर मला वाटतं की त्यांनी येऊच नये," असं टीम मँडर यांनी सांगितलं.



सोमवारी दोन्ही संघ हे न्यू साऊथ वेल्ससाठी रवाना होणार आहेत. परंतु यापूर्वीच आज करोनाचे आठ नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली होती. क्विन्सलँडनं न्यू साऊथ वेल्ससोबत आपल्या सीमा बंद केल्या आहेत. परंतु १५ जानेवारी रोजी खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना ब्रिसबेनसाठी विमानप्रवासाची परवानगी देण्याचा करार करण्यात आला आहे. "सध्या कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे याची आम्हाला जाणीव आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आम्ही बायो बबल प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी आणि नियमांचं पालन करण्यासाठी प्रत्येक वेळी सहकार्य केलं आहे. परंतु निर्बंधांच्या बाबती आम्हालाही ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांप्रमाणेच पाहिलं गेलं पाहिजे," असं भारतीय संघाच्या एका सूत्रानं क्रिकबझसी बोलताना सांगितलं.

Web Title: Boycott threats from players; Australian leader says "... then don't come"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.