आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील सातत्यपूर्ण खेळी करणारा फलंदाज म्हणून विराट कोहली ओळखला जातो. आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक 5412 धावा आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सर्वोत्तम एकादश संघात त्याचे स्थान हे निश्चितच असते, पण कर्णधार म्हणून त्याची निवड ही कदाचित आश्चर्यात टाकणारी आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!
2013मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विराटकडे नेतृत्व सोपवले आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून त्याची कामगिरी फार चांगली झालेली नाही. त्याला 110 सामन्यांत केवळ 49 विजय मिळवता आले आहेत. पण, तरीही ऑस्ट्रेलियाचा आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉज यानं कोहलीकडे नेतृत्व सोपवले आहे.
कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी
हॉजनं त्याचा आयपीएलमधील सर्वोत्तम एकादश संघ जाहीर केला. त्यानं जाहीर केलेल्या संघात चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा या आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांना स्थान मिळाले. पण, त्यांना कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सन धोनीच्या नेतृत्वाखाली तीन, तर मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चार जेतेपदं जिंकली आहेत.
49 वर्षीय हॉजनं सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांची निवड केली आहे. वॉर्नरनं आयपीएलमध्ये 4706 धावा केल्या आहेत, तर रोहितच्या नावावर 4898 धावा आहेत. रिषभ पंतने 54 सामन्यांत 1736 धावा केल्या आहेत आणि त्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर RCBच्या एबी डिव्हिलियर्सचा समावेश आहे. एबीनं 154 सामन्यांत 4395 धावा केल्या आहेत. धोनीकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यानंतर सुनील नरीन आणि रशीद खान यांच्यावर फिरकीची जबाबदारी सोपवली आहे. शिवाय हे दोघ फलंदाजीतही योगदान देतात. गोलंदाजी विभागात त्यानं जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मुनाफ पटेल यांना निवडले आहे. मुनाफची निवड आश्चर्यात टाकणारी आहे. त्यानं 63 सामन्यांत 74 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रॅड हॉजचा सर्वोत्तम आयपीएल संघ - डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार), रिषभ पंत, एबी डिव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी, सुनील नरीन, रशीद खान, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मुनाफ पटेल.
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?