Join us  

ब्रेथवेटची चिवट खेळी, विंडीजचा प्रतिकार; वेस्ट इंडिजच्या ४ बाद २२७ धावा

मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:19 AM

Open in App

मँचेस्टर : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज् यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज्ने इंग्लंडच्या आक्रमणाचा चिवटपणे सामना केला.तिसरा दिवस पावसाने वाया गेल्यावर चौथ्या दिवशी चहापानापर्यंत वेस्ट इंडिजने ७६.४ षटकांत ४ बाद २२७ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने १६५ चेंडूत ७५ धावा केल्या.

मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला. त्यानंतर तिसरा दिवस पावसाने वाया गेल्या चौथ्या दिवसाची सुरुवात वेस्ट इंडिज्साठी चांगली झाली नाही. जे.एम. कॅम्पबेल १२ धावांवर बाद झाला. त्याला सॅम कुरन याने पायचीत पकडले. त्यानंतर मात्र वेस्ट इंडिज्च्या फलंदाजांनी सावध पावित्रा घेतला.

क्रेग ब्रेथवेट याने ८ चौकारांच्या सहाय्याने आपली खेळी सजवली. त्याने अल्जारी जोसेफ (३२ धावा) याच्यासोबत ५४ धावांची, शाय होप (२५)सोबत ५२ धावांची भागीदारी केली. शामराह ब्रुक्स आणि क्रेग ब्रेथवेट यांनी ७६ धावांची भागीदारी केली. मात्र ब्रेथवेट बाद झाला. चहापानापर्यंत ब्रुक्स ६० तर रोस्टन चेस ८ धावांवर खेळत होता. कुरन याने दोन तर स्ट्रोक्स व डॉम बेस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज