Join us  

IPL मध्ये मुंबई इंडियन्स 'ब्रँड'! पण स्पर्धेच्या Brand Value मध्ये मोठी घसरण, वाचा सविस्तर

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 2:21 PM

Open in App

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलची स्पर्धा म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच... IPL च्या लिलावापूर्वी मोठी माहिती समोर आली आहे. खरे तर आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घट झाली आहे. यापूर्वी आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ९२,५०० एवढी होती, मात्र आता ती ११.७ टक्क्यांनी घसरून ८२,७०० वर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलला ब्रॉडकास्टिंग राइट्सचा खूप फायदा झाला, परंतु असे असून देखील ब्रँड व्हॅल्यूमध्ये घट झाली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची आयपीएलची सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला संघ म्हणून निवड करण्यात आली आहे. या लीगमध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला संघ मुंबई इंडियन्स आहे. सर्वात यशस्वी संघामध्ये मुंबईच्या संघाची गणना केली जाते. 

माहितीनुसार, आता आयपीएलच्या मीडिया राइट्समध्ये वेगळा दृष्टिकोन स्वीकारला जाईल. याशिवाय वायकॉम-१८ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे विलीनीकरण मार्गी लागणार आहे. तसेच मुंबई इंडियन्स हा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला संघ आहे. मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. या यादीत कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या स्थानावर आहे.

मुबंई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या संघांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघांचा नंबर लागतो. Ipl 2024 च्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या संघांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही संघांनी ५-५ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मागील वर्षी मुंबई इंडियन्स प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळली. पण, नवनिर्वाचित कर्णधारला आपल्या संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आले नाही.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२४